Padma Bhushan Kumar Mangalam Birla : देशातील ज्येष्ठ उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कुमार मंगलम बिर्ला हे बहुराष्ट्रीय समूह आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आहेत. ते भारतातील तिसरे मोठे व्यावसायिक आहेत.
कुमार मंगलम यांचा जन्म व्यापारी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांनी यशस्वी उद्योजक होण्याचे कौशल्य आत्मसात केले.
बॅचलर डिग्री मिळवल्यानंतर आणि चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर त्यांनी लंडनमधून पदव्युत्तर पदवी घेतली. ते 28 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले.
वडील गेल्यानंतर त्यांच्या खांद्यावर अनेक व्यावसायिक जबाबदाऱ्या आल्या. जेव्हा त्यांनी आदित्य बिर्ला समूहाचा ताबा घेतला तेंव्हा कापड, सिमेंट, अॅल्युमिनियम आणि खतांच्या व्यवसायात गुंतलेला एक मोठा व्यावसायिक समूह होता.
त्यावेळी त्यांना अनुभव नसल्यामुळे त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते पण त्यांनी अनेक आव्हाने स्वीकारली. त्यांनी व्यावसायिक कौशल्य दाखवत व्यवसायाचा विस्तार केला. त्यांनी नवीन व्यवसाय धोरणांना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या दृष्टिकोनामुळे संस्थेच्या कामकाजात अनेक बदल झाले .
त्यांचा जन्म १४ जून १९६७ रोजी एका मारवाडी व्यावसायिक कुटुंबात झाला. आदित्य विक्रम बिर्ला आणि त्यांची पत्नी राजश्री बिर्ला आणि त्यांना एक बहीण वासवदत्त असं हे कुटुंब. ते बिर्ला कुटुंबातील चौथ्या पिढीतील सदस्य आहेत आणि त्यांचे बालपण मुंबई आणि कोलकाता येथे गेले.
लहानपणापासूनच ते व्यावसायिक वातावरणात वाढल्यामुळे त्यांना कुटुंबाचे नाव, संपत्ती आणि त्याच्याशी संलग्न जबाबदारीची सतत जाणीव होत होती.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून बीकॉमची पदवी मिळवली. नंतर ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियामधून चार्टर्ड अकाउंटंट झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले आणि लंडन बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केले.
हेही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा
सॉफ्टवेअर, बीपीओ आणि टेलिकॉमसह अनेक क्षेत्रात त्यांनी व्यवसाय पसरवला. आज आदित्य बिर्ला समूहाचा व्यवसाय सहा खंडांतील ३६ देशांमध्ये पसरलेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, समूहाची उलाढाल ३० पटीने वाढून ६० अब्ज डॉलर झाली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने भारतात आणि परदेशात ४० हून अधिक कंपन्या विकत घेतल्या. भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने केलेले हे सर्वात मोठे अधिग्रहण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.