Pakistan : पाकिस्तानात महागाईने मोडला 48 वर्षांचा विक्रम; लोक म्हणाले, वीज आणि शिक्षण...

पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
Pakistan Inflation
Pakistan Inflation Sakal
Updated on

Pakistan Inflation News : पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून आता परिस्थिती अशी झाली आहे की, पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

बेलआउट पॅकेजबाबत IMF सोबतची चर्चाही अयशस्वी ठरली आहे, त्यामुळे पाकिस्तानला दिलासा मिळताना दिसत नाही.

सर्वात वाईट अवस्था पाकिस्तानातील सामान्य जनतेची आहे, ज्यांचे कंबरडे अगोदरच वाढत्या महागाईने मोडले आहे आणि आता परिस्थिती अशी आहे की लोकांना अन्न, शिक्षण आणि इतर गोष्टींची चिंता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमधील एका स्थानिक सीफूड व्यापाऱ्याने सांगितले की, महागाईमुळे त्यांची विक्री निम्मी झाली आहे. विशेषत: मध्यमवर्गीय लोक महागाईमुळे बाजारातून वस्तू खरेदी करत नाहीत. फक्त श्रीमंत वर्गच वाढत्या महागाईचा सामना करू शकतो.

Pakistan Inflation
Adani Group News : अदानींनी एका दिवसात गमावले ₹ 1,97,98,78,80,000, पाकिस्तानच्या परकीय...

एका पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाने सांगितले की, त्यांच्या पेट्रोल पंपावरील तेलाच्या विक्रीतही लक्षणीय घट झाली आहे. पूर्वी जिथे पेट्रोल पंपावर ग्राहकांची मोठी रांग असायची तिथे आज पेट्रोल पंप जवळपास रिकामेच आहेत.

याचे कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 262 रुपये आहे. अल्प उत्पन्न गटातील लोकांना पाकिस्तानात घरखर्च चालवण्यासाठीही कर्ज घ्यावे लागत आहे. लोक म्हणतात की, जीवन जगणे खूप कठीण झाले आहे, परंतु अशा परिस्थितीत ते काहीही करू शकत नाहीत.

हेही वाचा : वेळ सिमेंट आणि बँकांच्या शेअरमध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक करण्याची

पाकिस्तानातील शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांचा खर्च अनेक पटींनी वाढला आहे. वीज आणि मजुरीचा खर्च वाढल्याने शेती हा आता फायदेशीर व्यवहार राहिलेला नाही.

यासोबतच विजेचा तुटवडाही पाकिस्तानी जनतेसाठी अडचणीचा ठरला आहे. पाकिस्तानचे शेतकरी मोहम्मद रशीद म्हणतात की 'आमच्याकडे पुरेसे अन्न नाही, मग वीज, शिक्षण आणि कपड्यांची व्यवस्था कुठून करावी'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.