Panama Petrochem : या स्मॉल कॅप कंपनीची आता 150% डिव्हिडेंड देण्याची घोषणा, गुंतवणुकदारांना केले मालामाल

पनामा पेट्रोकेम (Panama Petrochem) या एनर्जी सेक्टरमधील स्मॉल-कॅप कंपनीचे शेअर्स अस्थिर वातावरणातही मजबूत आहेत.
Panama Petrochem
Panama Petrochemsakal
Updated on

पनामा पेट्रोकेम (Panama Petrochem) या एनर्जी सेक्टरमधील स्मॉल-कॅप कंपनीचे शेअर्स अस्थिर वातावरणातही मजबूत आहेत. सोमवारी हे शेअर्स बीएसईवर इंट्रा-डेमध्ये सुमारे 6 टक्क्यांच्या वाढीसह 373.90 रुपयांच्या विक्रमी किमतीवर पोहोचले. तर दुसरीकडे सेन्सेक्स अर्ध्या टक्क्यांनी घसरला आहे.

डिव्हिडेंड देण्याच्या घोषणेमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून येत असून गेल्या पाच दिवसांत त्यात सुमारे 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या  बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने 150 टक्के डिव्हिडेंड जाहीर केला आहे आणि त्याची तारीख 24 नोव्हेंबर 2022 निश्चित केली आहे. कंपनी 6 डिसेंबर 2022 रोजी शेअरहोल्डर्सना प्रति इक्विटी शेअर 3 रुपये अंतरिम डिव्हिडेंड देईल.

Panama Petrochem
Jalgaon Rice Stock Case: पंचनाम्यात रेशन तांदळाच्या शासकीय गोण्या निष्पन्न

मल्टीबॅगर पनामा पेट्रोकेम

पनामा पेट्रोकेमचे शेअर्स गुंतवणुकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. 20 नोव्हेंबर 2002 रोजी हे शेअर एक रुपयापेक्षाही कमी अर्थात 0.79 रुपयांवर होते. तर आता त्याचे शेअर्स सुमारे 20 वर्षांत 373.90 रुपयांवर पोहोचले आहेत, म्हणजेच 20 वर्षांत गुंतवणूकदारांचे भांडवल 473 पटीने वाढले आहे आणि केवळ 22,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर अनेकजण कोट्यधीश झालेत.

शॉर्ट टर्मसाठीही हे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरले आहेत. सुमारे अडीच वर्षांपूर्वी, 3 एप्रिल 2020 रोजी ते 28.40 रुपयांवर होते, म्हणजेच तेव्हापासून ते 1227 टक्क्यांनी वाढले आहे.

Panama Petrochem
Share Market Opening Update : शेअर बाजारात पडझडीचं सत्र थांबलं, सेन्सेक्सने घेतली भरारी

कंपनी काय करते ?
लुब्रिकेंट्स इंडस्ट्रीमधील पनामा पेट्रोकेम 80 पेक्षा जास्त प्रकारची पेट्रोलियम स्पेशालिटी प्रोडक्ट्स तयार करते. त्यांचे प्रोडक्ट्स पॉवर, केबल, इंक आणि रेझिन, टेक्सटाइल, रबर, सौंदर्य प्रसाधने, फार्मा आणि इतर उद्योगांमध्ये वापरली जातात.

त्याची उत्पादने यूएस, यूके, युरोप, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये निर्यात केली जातात. चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या जुलै-सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीत कंसालिडिटेड नेट प्रॉफिट 67.43 कोटी रुपये झाला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.