Paytm च्या शेअर्समध्ये 70 टक्के घसरण; सीईओ स्पष्टीकरण देत म्हणाले...

पेटीएमच्या शेअरर्समध्ये मोठ्या घसरणीनंतर गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
paytm
paytmsakal
Updated on

Paytm Share Update : पेटीएमच्या शेअरर्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर यात गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असताना, याबाबत कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी पेटीएमच्या शेअर्समध्ये होणाऱ्या घसरणाचे कारण सांगितले आहे. ते म्हणाले की, शेअर बाजारात अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे कंपनीच्या शेअर्सची किंमत घसरली असल्याचे म्हटले आहे. (Paytm CEO On Share Market )

paytm
ओलाने फिरताय AC लावण्यासाठी द्यावे लागतील अतिरिक्त पैसे?

कंपनी पुढील सहा तिमाहीत EBITDA नुसार खर्च वसूल करण्याच्या स्थितीत असेल, अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जगभरातील उच्च वृद्धि असणाऱ्या शेअर्ससाठी परिस्थिती अस्थिर बनली आहे, त्यामुळेच कंपनीच्या शेअरची किंमत IPO किंमतीच्या तुलनेत घसरली असल्याचे कंपनीच्या भागधारकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. (Paytm IPO)

नोव्हेंबर 2021 मध्ये, Paytm कंपनीने देशातील सर्वात जास्त IPO लाँच केले होते. मात्र, सततच्या घसणाऱ्या शेअर्सच्या किमतीमुळे गुंतवणूकदारांची खूप निराशा झाली आहे. कंपनीने 2,150 रुपये प्रति शेअर दराने आयपीओ लॉन्च केला होता, त्यानंतर यामध्ये घसरण होत याची किंमत 521 रुपयांच्या पातळीवर आली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी खरेदी दिसून आली असून, बुधवारी बाजार बंद होताना याची किंमत 637 रुपयांवर बंद झाला आहे.

paytm
पुरे झाला देवा आता पंचनामा; मोदी-पवार भेटीनंतर भातखळकरांचे खोचक ट्वीट

शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 566 तर निफ्टी 149 अंकांनी घसरला

शेअर बाजारात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या तेजीला ब्रेक लागला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात घसरण झाली. विकली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 566.09 अर्थात 0.94 टक्क्यांनी घसरून 59610.41वर बंद झाला, तर निफ्टीमध्येही 149.75 अर्थात 0.83 टक्क्यांची घसरण होऊन 17,807.65 बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.