Pension scheme : या विशेष खात्यामध्ये पैसे गुंतवलेत तर मिळेल ३६ हजार पेन्शन

या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात.
Pension scheme
Pension schemegoogle
Updated on

मुंबई : आजच्या काळात प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे. नोकरीनंतर म्हातारपणाची चिंता असते. अशा परिस्थितीत, कमी पगार असलेल्या लोकांसाठी, सरकार अशी योजना चालवत आहे, ज्यामुळे तुम्हाला घरी बसून वार्षिक ३६ हजार पेन्शन मिळेल.

सध्या सरकार अनेक बचत योजना चालवत आहे. त्यापैकी प्रधानमंत्री जन धन योजना खाते हे विशेष आहे. ज्या अंतर्गत लोकांना ३ हजार रुपये मासिक पेन्शन मिळते. (Pradhan Mantri Jan Dhan Yojana Account)

तुमचेही जन धन योजनेत खाते असल्यास, पीएम श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत सरकार खातेधारकांना ३,००० रुपये देईल. या योजनेसाठी माफक गुंतवणूक आवश्यक आहे.

वृद्धापकाळात पेन्शनची व्यवस्था असेल. या योजनेअंतर्गत, संपूर्ण ३ हजार रुपये प्रति महिना म्हणजेच वार्षिक ३६ हजार रुपये सरकार जन धन खातेधारकांना पाठवते. या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात.

कोण घेऊ शकतो लाभ ?

प्रधानमंत्री जन धन योजना खात्यातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळेल. ज्यामध्ये रस्त्यावरील विक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरकामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर घेऊ शकतात. तुमचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.

PMJDY खाते पेन्शनसाठी गुंतवणूक कशी करावी ?

PMJDY खाते पेन्शन मिळविण्यासाठी, वेगवेगळ्या वयोगटानुसार दरमहा ५५ ते २०० रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर तुम्हाला दरमहा ५५ रुपये गुंतवावे लागतील. ३० वर्षांच्या लोकांना १०० रुपये आणि ४० वर्षांच्या लोकांना २०० रुपये भरावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.