Petrol and Diesel Price in India Latest Updates: आधीच कोरोना महामारीने सर्वसामान्य आर्थिक अडचणीत असताना इंधन दरवाढीमुळे नवीन संकट निर्माण उभं राहिलं आहे. शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 29 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी महागलं आहे. आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. शनिवारी मुंबईत डिझेल प्रतिलिटर 100.29 रुपये इतके झालं आहे. तर पेट्रोल प्रतिलीटर 109.83 पोहचलं आहे. औरंगाबाद, नांदेड आणि परभणीत डिझेलच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठत शंभरी पार केली आहे. मुंबईसह मुंबई उपनगर, अमरावती, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये डिझेलचे दर शंभरी नजीक पोहोचले आहेत. त्यामुळे एकूणच राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका उडाला असून, दरवाढ सातत्याने सुरू राहिल्यास इंधन दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होऊन महागाईची शक्यताही अर्थतज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रतिलीटर 103.84 रुपये तर डिझेल प्रतिलीटर 92.47 रुपये इतकं झालं आहे. शनिवारी देशभरात पेट्रोल 30 ते 35 पैशांनी महागलं आहे तर डिझेलच्या दरांतही 35 ते 40 पैशांनी वाढ झाली आहे. 24 सप्टेंबरपासून देशात प्रतिलीटर डिझेल 3 रुपयांनी तर पेट्रोल दोन रुपयांनी वाढलं आहे. जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलची किंमत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 22 सप्टेंबरला क्रूड ऑईलची किंमत प्रतिबॅलर 70.70 डॉलर होती. परंतु, आता ती किंमत 74.99 डॉलरवर पोहचली आहे. इंधनाची मागणी वाढल्याने काही दिवसांत क्रूड ऑईलची किंमत 80 डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर अंदाजित दोन ते तीन रुपयांपर्यंत वाढतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
राजधानी दिल्ली :
पेट्रोल – 103.84 रुपये प्रति लीटर
डिझेल - 92.47 रुपये प्रति लीटर
मुंबई :
पेट्रोल – 109.83रुपये प्रति लीटर
डिझेल – 100.29 रुपये प्रति लीटर
कोलकाता:
पेट्रोल – 104.52 रुपये प्रति लीटर
डिझेल – 95.58रुपये प्रति लीटर
चेन्नई:
पेट्रोल – 101.27रुपये प्रति लीटर
डिझेल – 96.93 रुपये प्रति लीटर
भोपाळ:
पेट्रोल – 112.38 रुपये प्रति लीटर
डिझेल – 101.54 रुपये प्रति लीटर
हैदराबाद :
पेट्रोल – 108.02रुपये प्रति लीटर
डिझेल – 100.89 रुपये प्रति लीटर
बंगळुरु:
पेट्रोल – 107.46 रुपये प्रति लीटर
डिझेल – 98.15 रुपये प्रति लीटर
लखनऊ:
पेट्रोल- 100.89रुपये प्रति लीटर
डिझेल - 92.90 रुपये प्रति लीटर
आपल्या शहरात काय आहेत भाव? (How to check petrol-diesel price)
पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) आपण SMS च्या द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आपल्याला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर SMS पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.
दररोज सकाळी सहा वाजता बदलतात किंमती (how to decide price of petrol and diesel)
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती दररोज बदलत असतात. त्यानुसार दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात. सकाळी सहा वाजल्यापासून नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात. परकीय चलनांसहित आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती काय आहेत या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.