ऐन सणात इंधनाचे दर होणार कमी? जाणून घ्या, पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Fuel price
Fuel price
Updated on

मागील अनेक महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. एकिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाली असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे देशातील इंधन दरांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. महाराष्ट्र आणि मेघालय वगळता देशातील इतर राज्यांत तब्बल साडेतीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) स्थिर आहेत. दरम्यान, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती 88 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. 8 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच ही किंमत 90 डॉलर प्रति बॅरल खाली उतरल्या आहेत. 5 सप्टेंबर रोजी ओपेककडून मागणीत होत असलेली घट आणि जागतिक बाजारातील मंदीच्या सावटाच्या भीतीनं ऑक्टोबरपासून उत्पादन 1 लाख बॅरल प्रति दिवस कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Fuel price
डॉलरच्या तुलनेत रुपयाची सर्वात मोठी घसरण, एका डॉलरचा भाव 80.11 रुपये

देशातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही. नव्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

शहर पेट्रोलच्या किमती डिझेलच्या किमती

  • मुंबई - 106.25 94.22

  • पुणे - 105 92

  • नागपूर - 106.03 92.58

  • नाशिक - 106.74 93.23

  • धुळे - 106.05 92.58

  • नांदेड - 108.24 94.71

  • रायगड - 105.96 92.47

  • अकोला - 106.05 92.55

  • चंद्रपूर - 106.14 92.70

  • सांगली - 105.96 92.54

Fuel price
Share Market: शेअर बाजारात तेजीला पुन्हा ब्रेक, सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला

तेलाचे भाव स्थिर करण्याचा ओपेकचा प्रयत्न सुरु आहे. मात्र कच्च्या तेलाच्या दरांत मोठी अस्थिरता दिसून येत आहे. ओपेकनं घेतलेल्या निर्णयानंतर तेलाच्या किंमतीत मोठी उसळी आली. मात्र मागणीत घट होत असल्यानं पुन्हा किंमती अस्थिर होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, ओपेककडून उत्पादनात केलेली घट ही जागतिक बाजाराच्या तुलनेत 0.1 टक्के असल्यानं येत्या काळात तेलाच्या दरांत फार मोठी उसळी पाहायला मिळणार नाही. मात्र तेलाच्या दरांत मोठी वाढ झाल्यास त्याचा परिणाम थेट भारतावर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.