Petrol, Diesel Price: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, जाणून घ्या दर

petrol offer
petrol offer E Sakal
Updated on

Petrol and Diesel Price in India Latest Updates: पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. डिझेल (Diesel Price Hiked) लागोपाठ चौथ्या दिवशी महागलं आहे. तर तीन आठवड्यानंतर पेट्रोलचाही भडका (Petrol Price Hiked) उडाला आहे. मागील पाच दिवसांत डिझेल चौथ्यांदा महागलं आहे. आज, मंगळवारी डिझेल प्रतिलीटर 75 पैशांनी महागलं आहे. तर पेट्रोल देशभरात प्रति लीटर 20 ते 22 पैशांनी महागलं आहे. पेट्रोलच्या दरांत तीन आठवड्यानंतर बदल झाले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलच्या दर घसरले होते. मात्र, आता पुन्हा एकदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. डिझेलच्याही दरांमध्ये वाढ झाली आहे. एक ते पाच सप्टेंबर दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन वेळा कपात करण्यात आली होती. यावेळी प्रतिलीटर 15-15 पैशांनी किंमत कपात करण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये 30 पैशांनी घसरण झाली होती. पण त्यानंतर तीन आठवडे इंधन दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. त्यानंतर 24, 26 आणि 27 सप्टेंबर रोजीही डिझेलच्या दरात वाढ झाली होती. राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. खाद्य तेलापासून ते सर्वसामान्याच्या खाद्यातील डाळी पर्यंत महागाई जाणवू लागली आहे.

प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

राजधानी दिल्ली :

पेट्रोल – 101.39 रुपये प्रति लीटर

डिझेल - 89.57 रुपये प्रति लीटर

मुंबई :

पेट्रोल – 107.47 रुपये प्रति लीटर

डिझेल – 97.21 रुपये प्रति लीटर

कोलकाता:

पेट्रोल – 101.87 रुपये प्रति लीटर

डिझेल – 92.62 रुपये प्रति लीटर

चेन्नई:

पेट्रोल – 99.15 रुपये प्रति लीटर

डिझेल – 94.17 रुपये प्रति लीटर

बंगळुरु:

पेट्रोल – 104.92 रुपये प्रति लीटर

डिझेल – 95.06 रुपये प्रति लीटर

भोपाळ:

पेट्रोल – 109.85 रुपये प्रति लीटर

डिझेल – 98.45 रुपये प्रति लीटर

लखनऊ:

पेट्रोल- 98.51 रुपये प्रति लीटर

डिझेल - 89.98 रुपये प्रति लीटर

पाटना:

पेट्रोल – 104.04 रुपये प्रति लीटर

डिझेल –95.70 रुपये प्रति लीटर

चंडीगढ़ :

पेट्रोल –97.61 रुपये प्रति लीटर

डिझेल – 89.31 रुपये प्रति लीटर

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 3 वर्षांतील विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. ब्रेंट क्रूडचे दर 80 डॉलर प्रति बॅलरच्या आसपास पोहचले आहे. त्यामुले दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव विक्रमी पातळी गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपल्या शहरात काय आहेत भाव? (How to check petrol-diesel price)

पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) आपण SMS च्या द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आपल्याला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर SMS पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.

दररोज सकाळी सहा वाजता बदलतात किंमती (how to decide price of petrol and diesel)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती दररोज बदलत असतात. त्यानुसार दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात. सकाळी सहा वाजल्यापासून नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात. परकीय चलनांसहित आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती काय आहेत या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.