इंधन दरवाढ कायम; पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, 14 दिवसांत 12 वेळा दरवाढ

Petrol-Diesel Price Today 4 April 2022
Petrol-Diesel Price Today 4 April 2022 esakal
Updated on
Summary

देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी सिलिंडर, दूध आणि भाजीपाला यासह दैनंदिन वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झालीय.

IOCL, Petrol-Diesel Price Today 4 April 2022 : देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी सिलिंडर, दूध आणि भाजीपाला यासह दैनंदिन वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झालीय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 100 डॉलरच्या जवळपास पोहोचली असली तरी, भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याचा ट्रेंड कायम आहे.

आज (सोमवार) पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलीय. देशाची राजधानी दिल्लीत आज म्हणजेच, 4 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 40-40 पैशांनी वाढ झालीय. यासह दिल्लीत आता पेट्रोल 103.81 रुपये आणि डिझेल 95.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचलंय.

इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी (Indian Petroleum Marketing Company) इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (IOCL) ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 4 एप्रिल 2022 रोजी पेट्रोलचा दर प्रति लिटर 118.83 रुपये झालाय, तर डिझेलचा दर 103.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय. राज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलताहेत. देशातील चार महानगरांची तुलना केल्यास मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. दिल्लीशिवाय इतर सर्व महानगरांमध्ये 100 रुपयांच्या पुढं डिझेल विकलं जात आहे.

Petrol-Diesel Price Today 4 April 2022
मोदींचं 'गुजरात' जिंकण्यासाठी काँग्रेस मोठा डाव खेळणार!

14 दिवसांत पेट्रोल 8.40 रुपयांनी महागलं

22 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत 14 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 12 वेळा वाढ करण्यात आलीय. दरम्यान, 24 मार्च आणि 1 एप्रिल रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नव्हता, त्यामुळं देशभरातील किमती स्थिर होत्या. बहुतांश दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झालीय.

Petrol-Diesel Price Today 4 April 2022
सत्तेत राहून नितीश कुमार फक्त आपलं आयुष्य घालवताहेत : तेजस्वी यादव

कोणत्या दिवशी पेट्रोलचे दर किती वाढले?

तारीख किती रुपयांनी वाढलं

22 मार्च 80 पैसे

23 मार्च 80 पैसे

25 मार्च 80 पैसे

26 मार्च 80 पैसे

27 मार्च 50 पैसे

28 मार्च 30 पैसे

29 मार्च 80 पैसे

30 मार्च 80 पैसे

31 मार्च 80 पैसे

02 एप्रिल 80 पैसे

03 एप्रिल 80 पैसे

04 एप्रिल 40 पैसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.