Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार? हे आहे कारण

देशभरातील महागाईचा सामना करणार्‍या जनतेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार?
पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार?sakal
Updated on

Petrol Diesel Prices In India : देशभरातील महागाईचा सामना करणार्‍या जनतेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच कमी होऊ शकतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत कपात होऊ शकते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण हे दर कमी करण्यामागचे मुख्य कारण होऊ शकते. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी आता तोट्याऐवजी नफा कमवायला सुरुवात केली आहे. हे पाहता पेट्रोल कंपन्या लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयां पर्यंत कपात करू शकतात.

पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार?
Digital Rupee : क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल रुपयामध्ये काय फरक आहे?

जर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या तर मे 2022 नंतर तेलाच्या किमतीतील ही पहिली घट असेल. मे महिन्यात सरकारने दोन्ही इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यानंतर सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 6 रुपयांनी कमी केले होते. सरकारी तेल कंपन्यांना पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे नफा मिळू लागला आहे. कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 6 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांपर्यंत नफा मिळत आहे.

पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार?
Income Tax Return : आता येणार एक राष्ट्र एक आयटीआर फॉर्म?

सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लिटरमागे दोन रुपयांची कपात केल्यास जनतेला महागाईपासून दिलासा मिळेल. सरकारने उत्पादन शुल्क कमी केले होते, तेव्हा क्रूड ऑईलची किंमत प्रति बॅरल $ 115 होती, जी सध्या प्रति बॅरल $ 95 वर चालू आहे. सप्टेंबरमध्ये त्याची किंमत प्रति बॅरल $ 90 वर गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.