पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा तुमच्या शहरातले आजचे दर

पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा तुमच्या शहरातले आजचे दर
Updated on

Petrol-Diesel Price Today : मागील दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशातील महत्वाच्या शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभर रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत. तर डिझेलही ९० रुपयांवर पोहचलं आहे. गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढ झाली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. आज, बुधवारीही इंधनाच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर राहिल्यामुळे देशातील इंधन दरवाढीला ब्रेक लागला आहे. तसेच देशात सुरु असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.  

आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरेल ६८ डॉलर इतकी कच्या इंधनाची किंमत झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमती सातत्यानं बदलत असल्यामुळेच भारतामध्ये इंधनाच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. देशातील मार्केटमध्ये इंधन कंपन्याने लागोपाठ १८ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली नाही.  याआधी २७ फेब्रुवारी रोजी देशात पेट्रोल -डिजलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली होती. मार्च महिन्यात आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झालेली नाही. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर ९१.१७ रुपये इतकी आहे. तर डिझेल ८१.४७ रुपये प्रतिलीटरमध्ये मिळतेय. दिल्लीतील आतापर्यंतची ही सर्वात जास्त किंमत आहे. याआधी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलिटर ९० रुपयांपेक्षा पुढे गेलं नव्हतं.  

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे भाव -

पुणे -
पुण्यात पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९७.१९ इतकी आहे. महिनाभरापूर्वी पुण्यात पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९१.२३ इतकी होती.  म्हणजेच महिनाभरात पेट्रोल प्रतिलिटर जवळपास सहा रुपयांनी महागलं आहे. तीन महिन्यापूर्वी पुण्यात पेट्रोल प्रतिलिटर ८७.५१ होतं. म्हणजेच तीन महिन्यात पेट्रोल प्रतिलिटर १० रुपयांनी वाढलं आहे.   पुण्यात बुधवारी डिझेलची किंमत प्रतिलिटर ८६.८८ रुपये इतकी आहे.  महिनाभरापूर्वी डिझेल प्रतिलिटर ८०.३२ रुपये किंमतीमध्ये मिळत होतं. म्हणजे महिनाभरात डिझेल ६ रुपये ५६ पैशांनी महागलं आहे. तीन महिन्यापूर्वी डिझेलची किंमत प्रतिलिटर ७५.४८ इतकी होती.  तीन महिन्यात पुण्यात डिझेल जवळपास साडेअकरा रुपयांनी महागलं आहे. 

मुंबई -
मुंबईमध्ये पेट्रोल प्रतिलिटर ९७.५७ रुपये आहे तर डिझेलची किंमत प्रतिलिटर ८८.६० रुपये इतकी आहे. महिनाभरापूर्वी मुंबई पेट्रोल प्रतिलिटर ९१.५४ रुपये होती. तर तीन महिन्यापूर्वी मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८७.८ रुपये इतकी होती. तीन महिन्यात मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर जवळपास १० रुपयांनी महागलं आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशाप्रकारे तपासा
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती  लागू होत असतात. एसएमएसद्वारे आपण पेट्रोल-डिझेलची किंमत तपासू शकतो. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.  याशिवाय https://www.mypetrolprice.com/ या संकेतस्थळावरुनही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची माहिती मिळू शकते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.