लग्नानंतर PF नॉमिनेशनमध्ये पत्नीचे नाव हवेच, अन्यथा.. जाणून घ्या नियम

pf nomination after marriage is mandatory to add wife name for eps fund check all the rules here
pf nomination after marriage is mandatory to add wife name for eps fund check all the rules here
Updated on

भविष्य निर्वाह निधी (Provident Fund)चे पैसे तुमच्या रिटायरमेंट (Retirement) नंतर कामाला येतात. दरम्यान EPFO सदस्याचा मृत्यू झाल्यास, ती रक्कम कुटुंबासाठी देखील उपयुक्त ठरते. पण, तुम्हाला माहीत आहे का की, तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमचा संपूर्ण फंड अडकून पडू शकतो. तुम्हाला माहिती आहे का की, एखाद्या व्यक्तीचे लग्न होताच त्याच्यासाठी EPF आणि EPS चे नियम बदलतात. यासाठी नॉमिनेशन करताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

नॉमिनेशन देखील होतं रद्द

ईपीएफओच्या सदस्याचे लग्नानंतर, त्याचे ईपीएफ आणि ईपीएसमधील नॉमिनेशन रद्द केले जाऊ शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) योजना, 1952 च्या नियमांमध्ये याचा उल्लेख आहे. नियमांनुसार, विवाहापूर्वी सदस्याने ईपीएफ आणि ईपीएससाठी जे काही नॉमिनेशन केले असेल ते लग्नानंतर अवैध ठरते. म्हणजे लग्नानंतर पुन्हा नॉमिनेशन करावे लागते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लग्नापूर्वी ईपीएफ आणि ईपीएसमधील नॉमिनेशन लग्नानंतर आपोआप रद्द होतात.

pf nomination after marriage is mandatory to add wife name for eps fund check all the rules here
मारुती सुझुकीची 2022 Baleno फेसलिफ्ट लॉन्च, पाहा किंमत अन् फीचर्स

EPF-EPS नॉमिनेशन चे नियम

ईपीएफ कायद्यात कुटुंबातील सदस्य कोण असू शकतात, हे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. केवळ या लोकांना ईपीएफ खात्यात नॉमिनेट करण्याची परवानगी आहे. EPF कायद्यान्वये, पुरुष सदस्याच्या बाबतीत 'कुटुंब' म्हणजे पत्नी, मुले (विवाहित असोत किंवा नसोत), आश्रित पालक आणि मृत मुलाची पत्नी आणि मुले. महिला सदस्याच्या बाबतीत 'कुटुंब' म्हणजे पती, मुले, आश्रित आई-वडील, सासू-सासरे आणि मृत मुलाची पत्नी व मुले यांचा समावेश होतो.

'कुटुंबातील सदस्य' नसेल तर काय होईल?

नियमांनुसार, जर ईपीएफ सदस्याचे कुटुंबातील कोणताही सदस्य नसतील, तर तो कोणत्याही व्यक्तीला नॉमिनेट करू शकतो. परंतु, लग्नानंतर नॉमिनेशन अवैध होईल.

pf nomination after marriage is mandatory to add wife name for eps fund check all the rules here
E-PAN कार्ड महत्वाचे का आहे? घरबसल्या कसे करू शकता डाउनलोड, वाचा

लग्नानंतर नॉमिनेशन केले नाही आणि मृत्यू झाला तर?

जर EPF योजनेंतर्गत कोणतेही नॉमिनेशन केले गेले नसेल, तर निधीमध्ये जमा केलेली संपूर्ण रक्कम कुटुंबातील सदस्यांमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल. जर त्या व्यक्तीचे लग्न झाले नसेल, तर ती रक्कम अवलंबून असलेल्या पालकांना दिली जाईल

कुटुंब नसलेल्या सदस्याला नॉमिनेट करता येते का?

नियमांतर्गत नमूद केलेल्या कुटुंबातील सदस्यांनीच EPF आणि EPS खात्यांमध्ये नॉमिनेशन करावे. जर तुम्हाला तुमच्या पती किंवा वडिलांसारख्या कुटुंबातील सदस्याला वगळायचे असेल, तर ईपीएफच्या बाबतीत, तुम्हाला ते ईपीएफओ आयुक्तांना लिखित स्वरूपात द्यावे लागेल. तसेच जर पती-पत्नीचा घटस्फोट झाला असेल आणि त्यांना अपत्ये नसेल तर दोघांपैकी कोणाचाही मृत्यू झाला तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या पालकांना पेन्शन दिली जाईल.

pf nomination after marriage is mandatory to add wife name for eps fund check all the rules here
घरी बसून फोनवर करा ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज, पाहा सोपी प्रोसेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.