Pharma Share : डॉ रेड्डीजच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी, ऐका तज्ज्ञ काय सांगतायत?

इंट्रा-डेमध्ये, तो बीएसईवर 3 टक्क्यांहून अधिक वाढून 4382.35 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला.
Dr Reddy Share
Dr Reddy Sharesakal
Updated on

Pharma Share : फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी दिसून येत आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये सुमारे दीड टक्‍क्‍यांची घसरण आहे, पण डिसेंबर तिमाहीतील उत्कृष्ट निकालांच्या आधारे डॉ. रेड्डीजचे शेअर्स वेगाने वाढत आहेत. इंट्रा-डेमध्ये, तो बीएसईवर 3 टक्क्यांहून अधिक वाढून 4382.35 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. (Pharma Shares Dr Reddys Laboratories have best return)

बाजारातील तज्ज्ञांनी यामध्ये आणखी तेजीचा कल दिसत असून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यात बाय रेटींग देत टारगेट 5,131 रुपये निश्चित केले आहे, जे सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 18 टक्क्यांनी वाढीव आहे. सध्या हे शेअर्स 4330 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

Dr Reddy Share
Share Market Closing : शेअर बाजारासाठी आजचा दिवस ठरला ब्लॅक फ्रायडे; गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटी रुपयांचे नुकसान

रेव्हलिमिडच्या (Revlimid) अपेक्षेपेक्षा जास्त विक्रीमुळे डॉ रेड्डीजसाठी डिसेंबर 2022 ची तिमाही अपेक्षेपेक्षा चांगली होती असे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले.

चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसर्‍या तिमाहीत, ऑक्टोबर-डिसेंबर 2022 साठी डॉ. रेड्डींचा महसूल वार्षिक 27.3 टक्क्यांनी वाढून 6770 कोटींवर पोहोचला, तर आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा अंदाज 5860 कोटी रुपये होता. ब्रोकरेज फर्मने अंदाजे 28.1 कोटी डॉलरचा अंदाज वर्तवला होता, पण महसूल तिमाही आधारावर 6.8 टक्क्यांनी वाढून 37.5 कोटी डॉलर झाला.

Dr Reddy Share
Auto Stock : गुजरातमधील ही ऑटो कंपनी चर्चेत, 6 महिन्यात चक्क 109% रिटर्न

मागील वर्षी 4 मार्च 2022 रोजी डॉ. रेड्डीजचे शेअर्स 3655 रुपयांवर होते, जे एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. यानंतर, तो 8 महिन्यांत 27 टक्क्यांनी वाढून 4645.55 रुपयांवर पोहोचले, जो 52 आठवड्यांचा विक्रमी उच्चांक आहे. पण आता सध्या हा शेअर 7% सवलतीत उपलब्ध आहे. शिवाय सध्याच्या 4330 रुपयांवरून 18% वाढून तो 5131 रुपयांवर पोहोचू शकतो असा विश्वासही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Dr Reddy Share
Auto Stock : गुजरातमधील ही ऑटो कंपनी चर्चेत, 6 महिन्यात चक्क 109% रिटर्न

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.