ऐन दिवाळीत Cost Cutting चं संकट, ही कंपनी देणार ४ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

ग्लोबल टेक्नॉलॉजी फर्म फिलिप्सने कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर केले असून, कंपनीची उत्पादकता वाढवण्यासाठी कंपनीने 4,000 नोकऱ्या कमी करणार असल्याचे म्हटले आहे.
Cost Cutting
Cost CuttingSakal Digital
Updated on

ग्लोबल टेक्नॉलॉजी फर्म फिलिप्सने कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर केले असून, कंपनीची उत्पादकता वाढवण्यासाठी कंपनीने 4,000 नोकऱ्या कमी करणार असल्याचे म्हटले आहे. फिलिप्सने एका निवेदनात म्हटले आहे की,  बाजारातील विक्रीवर तिसऱ्या तिमाहीत परिणाम झाला आहे. 12 ऑक्टोबर रोजी कंपनीनीने सांगितल्या प्रमाणे, कंपनीची एकूण विक्री 4.3 अब्ज युरो झाली आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीची विक्री 5% टक्क्यांनी घसरली आहे.

Cost Cutting
Gold Rate: भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर सोनं घसरलं! जाणून घ्या आजचे नवे दर

फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स यांनी निवेदनात म्हटले आहे की, उत्पादकता वाढवण्याच्या प्रक्रियेत, जागतिक स्तरावर सुमारे 4,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

फिलिप्स कंपनीच्या नफ्यात वाढ करण्यासाठी आणि कंपनीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही पाऊले उचलली आहेत. तसेच कंपनीच्या भागधारकांना देखील लाभांश हवा असतो त्यामुळे कंपनीच्या फायद्यासाठी आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतात. असे कंपनीचे सीईओ रॉय जेकब्स यांनी सांगितले.

philips
philips sakal

उत्पादनात विक्रीतील वाढत्या समस्या,  महागाई वाढ, चीनमधील असणारी कोविड परिस्थिती आणि रशिया-युक्रेन युद्ध यामुळे फिलिप्सच्या नफ्यावर परिणाम झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.