शेतकऱ्यांनो, या महिन्यात पूर्ण करा 'हे' काम! मिळतील 4 हजार रुपये

केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातात.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaEsakal
Updated on
Summary

केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातात.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेच्या पुढील आठवड्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातात. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षाला ६ हजार रुपये वर्ग केले जातात. सरकार हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये पाठवते. म्हणजे केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये ट्रान्सफर करते.

PM Kisan Yojana
NSC : गुंतवणूकीवर टॅक्स कपातीसह उत्तम व्याज दर देणारी सरकारी योजना!

आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हप्त्यांमध्ये पैसे पाठवले आहेत. पुढील हप्ता एप्रिल महिन्यात येणे अपेक्षित आहे. पण आता नव्या नियमांनुसार ई-केवायसी करणं आवश्यक असणार आहे. तसे केले नाही तर शेतकऱ्यांना फायदा होणार नाही.

पूर्ण करा ई-केवायसी

तुम्हाला 11 व्या हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील तर 31 मार्च 2022 पूर्वी पीएम किसान योजनेचे ई-केवायसी (E-KYC) पूर्ण करा. अन्यथा त्याशिवाय एप्रिल-जुलैचा दोन हजार रुपयांचा हप्ता खात्यात येणार नाही. ई-केवायसी शेतकरीही ते स्वतः करू शकतात. मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असेल तर पीएम-किसानच्या वेबपोर्टलवर जाऊन ई-केवायसीचा पर्याय निवडावा लागतो. त्यांना पोर्टलवर आधार क्रमांक विचारला जाईल. पोर्टलवर दिसणारा इमेज टेक्स्ट भरून सर्च ऑप्शनवर क्लिक करणे आवश्यक आहे.

PM Kisan Yojana
झोपडपट्टी धारकांसाठी नळ योजना

त्यानंतर मोबाईल नंबर टाकावा लागेल. जे भरून गेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल. शेतकऱ्याच्या मोबाईलवर OTP पाठवला जाणार असून, तो पोर्टलवर भरून सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल. शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक न केल्यास त्यांना जनसुविधा केंद्रात जाऊन बायोमेट्रीक ई-केवायसी करून घ्यावे लागणार आहे.

कोणाला मिळणार चार हजार रुपये?

नवीन वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांना योजनेच्या १० व्या हप्त्यासाठी दोन हजार रुपये मिळाले होते. आता लवकरच पंतप्रधान किसान योजनेचा 11 वा हप्ता येणार आहे. अशा परिस्थितीत योजनेच्या लाभार्थ्यांना विशेष संधी असून त्यांना यावेळी 4000 रुपये मिळू शकतात. जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, मात्र अद्याप अर्ज करू शकलेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना ही संधी उपलब्ध होणार आहे. नव्या शेतकऱ्यांनी 31 मार्च 2022 पूर्वी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केल्यास त्यांना दोन हप्ते एकत्र मिळतील. म्हणजेच ११ व्या हप्त्याचे दोन हजार रुपये तसेच दहाव्या हप्त्याचे मिळून त्यांना एकूण चार हजार रुपये मिळू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.