PM Kisan Sanman Yojana : या चुका करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत योजनेचे पैसे

आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना 12 हप्ते देण्यात आले आहेत. आता केंद्र शासनाच्या माध्यमातून 13 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे.
PM Kisan Sanman Yojana
PM Kisan Sanman Yojanagoogle
Updated on

मुंबई : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत महत्त्वाची शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.

हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे खात्यात मिळतात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना 12 हप्ते देण्यात आले आहेत. आता केंद्र शासनाच्या माध्यमातून 13 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे.

PM Kisan Sanman Yojana
Government scheme : साठी ओलांडताच खात्यात येतील एवढे पैसे

दरम्यान अनेक शेतकरी बांधव पात्र असून देखील या योजनेचा पैसा त्यांच्या खात्यावर येत नाही. खरं पाहता शेतकरी बांधव अनेकदा छोट्या छोट्या चुका करतात ज्यामुळे शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळत नाही. आज आपण देखील शेतकरी बांधवांना नेमकं कशामुळे या योजनेचा पैसा मिळत नाही याविषयी जाणून घेणार आहोत.

ई-केवायसी नसताना 

योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी सुरू केले आहे. ई-केवायसीशिवाय हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार नाही. केंद्र सरकारच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचना आहेत की जर 13वा हप्ता हवा असेल तर पीएम किसान पोर्टलवर त्वरित ई-केवायसी करा.

बँक खाते आणि आधार तपशील वेगळे असल्यास 

आधार कार्ड हे देशातील प्रमुख ओळखपत्र मानले जाते.  आधार कार्ड माहिती वैध आहे. अशा स्थितीत बँकेच्या पासबुक आणि आधारकार्डवरील नाव किंवा अन्य तपशील वेगळे नसावेत. नावाच्या अक्षरात तफावत असेल किंवा नाव वेगळे असेल, तरीदेखील शेतकऱ्याला रक्कम मिळत नाही.

नाव बरोबर नसल्यास

अनेकवेळा आधार कार्डमध्ये शेतकऱ्यांचे नाव किंवा बँकेत टाकलेली कागदपत्रे बरोबर नसतात. पोर्टलवर नोंदणी करताना शेतकरी चुकीची नावे टाकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा हप्ता अडकला आहे.

PM Kisan Sanman Yojana
Post office scheme : पोस्ट ऑफीसच्या या योजनेत पंतप्रधानही करतात गुंतवणूक

बँक तपशील योग्यरित्या भरलेला नसेल तर

बँकेचे तपशील बरोबर भरले नसले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पोहोचत नाही. बँकेचा बँक खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड चुकीचा टाकला असेल, तर शेतकऱ्याला पैसे मिळणार नाहीत.

पत्ता बरोबर नसेल तर

नोंदणीच्या वेळी शेतकऱ्याचे प्रत्येक अपडेट योग्य असावे. तपशील भरण्यात शेतकरी कधीकधी कमी पडतात. काही वेळा पत्त्याचे तपशील भरण्यात चूक होते. सर्व काही ठीक आहे हे शेतकऱ्याला समजते पण ते नीट होत नाही आणि शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत.

साडेचार कोटी लोकांना बारावा हप्ता मिळाला नाही

या वेळी शेतकऱ्यांना 12 वा हप्ता वेळेवर मिळू शकला नाही. सुमारे एक ते दीड महिना शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 करोड शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 हजार कोटींची रक्कम पाठवली होती. साडेचार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेच पाठवले गेले नाहीत. तपासात हे शेतकरी अपात्र असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()