शेतकऱ्यांसाठी खूशखबर! PM Kisan e-KYC करण्यासाठी मुदत वाढवली

शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत वेळ दिली होती
PM kisan
PM kisanSakal
Updated on

PM Kisan e-KYC: पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित १२.५३ कोटी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यासाठी ३१ मार्च ही तारीख दिली होती. पण काही शेतकरी वेळेवर ई-केवायसी करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ मे पर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना दोन हजार रूपयांचा शेवटचा हप्ता त्यांना भरता येणार आहे.

PM kisan
Gold Loan: 'या' बॅंका देतात स्वस्त गोल्ड लोन! फक्त ही घ्या काळजी

अशाप्रकारे पूर्ण करा ई- केवायसी

स्टेप १ - मोबाईलवरून गुगल क्रोमवर जाऊन pmkisan.gov.in टाईप करा. त्यानंतर तुम्ही पीएम किसान पोर्टलच्या होमपेजवर जाल. तिथे तुम्हाला e-KYC असे लिहिलेले दिसेल. तिथे क्लिक करून तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून सर्च बटण दाबा.

स्टेप २- नंतर आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका. त्यानंतर मोबाईलवर चार अंकी ओटीपी येईल. तो टाका.

PM kisan
बायकोच्या नावाने उघडा Special Account! महिन्याला मिळतील ४५ हजार

स्टेप ३- त्यानंतर ऑथेंटिफिकेशनसाठी बटन दाबा. त्यानंतर पुन्हा ६ अंकी ओटीपी येईल. तो भरून सबमिट बटण दाबा. पूर्ण प्रक्रिया योग्य प्रकारे केली तर e-KYC पूर्ण होईल. नाहीतर Invalid असा पर्याय दिसेल. यामुळे एप्रिलमध्ये येणारा तुमचा हप्त्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आधार सेवा केंद्रावर जा आणि ते दुरुस्त करून घ्या.

पीएम किसान योजनेअंतर्गत, मोदी सरकार प्रत्येक आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना ६००० रुपये देते. ते ३ हप्त्यांमध्ये दिले जाते. या वर्षाचा शेवटचा हप्ता १ एप्रिल नंतर येणार आहे.

PM kisan
2024 पर्यंत 'या' कंपनीत असतील 50 टक्के महिला कर्मचारी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.