Polyplex Corporation कंपनीने दिला एवढा रिटर्न, गुंतवणुकदार झाले मालामाल

लाँग टर्ममध्येच नाही तर शॉर्ट टर्ममध्येही त्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
Polyplex Corporation
Polyplex Corporationsakal
Updated on

Polyplex Corporation : प्लॅस्टिक फिल्म बनवणारी कंपनी पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशनचे (Polyplex Corporation) शेअर्स गेल्या काही दिवसांपासून अस्थिर दिसत आहेत. नुकतेच त्याचे शेअर्स एनएसईवर 1551 रुपयांवर बंद झाले.

पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशनचे शेअर्स गेल्या सहा महिन्यांत सुमारे 32 टक्क्यांनी घसरले आहेत. पण लाँग टर्मचा विचार केल्यास त्यांच्या शेअर्सनी दमदार परफॉर्म केले आहे. 20 वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 11074% परतावा दिला आहे. त्यांची फ्री फ्लोट मार्केट कॅप 2,388.10 कोटी आहे. (Polyplex Corporation Indian Multinational company which manufactures Polyester or plastic Film have shares best return for investors )

पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशनचे शेअर्स 31 जानेवारी 2003 रोजी केवळ 13.88 रुपयांना होते. आता ते 112 पटीने अधिक म्हणजे 1551 रुपये झाले आहे, म्हणजे पॉलीप्लेक्समध्ये त्यावेळी गुंतवलेले 1 लाख रुपये आजच्या घडीला 1.12 कोटी रुपये झाले असते.

लाँग टर्ममध्येच नाही तर शॉर्ट टर्ममध्येही त्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. 27 मार्च 2022 रोजी त्याची किंमत 301.60 रुपये होती, म्हणजे वर्षभरापेक्षाकमी कालावधीत या शेअर्सने गुंतवणूकदारांचे भांडवल 414 टक्क्यांनी वाढवले आहे.

Polyplex Corporation
Best Stock : मल्टीबॅगर ठरलेला 'हा' शेअर विक्री करण्याचा शेअर बाजार तज्ज्ञांचा सल्ला

गेल्या वर्षी 11 एप्रिल 2022 रोजी त्याची किंमत 2870 रुपये होती, जी एका वर्षातील उच्चांकी पातळी आहे. त्यानंतर 23 डिसेंबर 2022 पर्यंत हे शेअर्स आठ महिन्यांत 1463.30 रुपयांवर गेले म्हणजे 49 टक्क्यांनी घसरले. हा 52 आठवड्यांचा विक्रमी नीचांक आहे. सध्या ही किंमत 6 टक्‍क्‍यांनी सावरली असली तरी ती अजूनही 46 टक्‍क्‍यांच्या एका वर्षातील विक्रमी उच्चांकावर आहे.

Polyplex Corporation
Stock Market In 2023 : नवीन वर्षात असा असेल शेअर बाजाराचा मूड; 'या' ६ गोष्टींचा होणार परिणाम

कंपनीकडे जगातील सातव्या क्रमांकाची पॉलिस्टर उत्पादन क्षमता असल्याचे पॉलीप्लेक्सच्या वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे. ही कंपनी पातळ आणि जाड अशा दोन्ही प्रकारचे पॉलिस्टर बनवते. याव्यतिरिक्त, ते विविध प्रकारच्या बेस फिल्म्स तसेच मेटालायझर, होलोग्राफी, कोटिंग आणि ट्रान्सफर मेटॅलाइज्ड पेपर सारख्या फिल्म्सचे उत्पादन करते.

त्याचा व्यवसाय जगभर पसरलेला आहे. कंपनी 75 देशांमध्ये 2650 पेक्षा जास्त ग्राहकांना उत्पादने पुरवते. त्यांची उत्पादने पाच देशांमध्ये ज्यात भारत, थायलंड, इंडोनेशिया, टर्की आणि अमेरिकेत विकली जातात.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.