Share Market: शेअर बाजारात घसरणीनंतर सकारात्मकता; सेन्सेक्स वधारला तर निफ्टी घसरला

सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात थोडी सकारात्मकता
Today's Stock Market Updates | Share Market News
Today's Stock Market Updates | Share Market Newssakal
Updated on

सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात थोडी सकारात्मकता दिसून आली आहे. गेल्या दोन दिवसात शेअर बाजारात घसरण दिसून येत होती. आजही सुरवातीच्या सत्रात शेअर बाजारात सेन्सेक्स वधारला तर निफ्टी घसरला आहे. आज बाजारात सेन्सेक्स 29 अंकाच्या तेजीसह 62,010 वर सुरू झाला तर निफ्टी 10 अंकाच्या घसरणीसह 18,401 वर सुरू झाला. आज सुरवातीच्या सत्रात 24 शेअर्समध्ये तेजी तर 26 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. ( share market update 17 November 2022)

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

शेअर बाजार गुरुवारी साईडवेज मुव्हमेंटसह एका रेंजमध्ये व्यापार करताना दिसत होता. पण शेवटच्या ट्रेडिंग तासात निवडक शेअर्समध्ये खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या चिन्हात बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.  आशियाई आणि युरोपीय बाजारातील मंदीमुळे भारतीय गुंतवणूकदारही सावध दिसले.

Today's Stock Market Updates | Share Market News
Gold Rate: सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे नवे दर

गेल्या आठवड्यातील मजबूत रॅलीनंतर देशांतर्गत अर्थव्यवस्थेत चांगली चिन्हे असूनही गुंतवणूकदार खरेदीसाठी घाई करण्याच्या मूडमध्ये नाहीत. तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीने डेली चार्टवर एक छोटी डोजी कँडल तयार केली आहे.

सध्या बाजाराची दिशा स्पष्टपणे दिसत नाही. आता जर निफ्टी 18450 च्या वर गेला तरच त्याला नवीन गती मिळेल. याच्या वर गेल्यास निफ्टीमध्ये 18550-18600 ची पातळी दिसू शकते. दुसरीकडे, जर निफ्टी 18350 च्या खाली घसरला तर निफ्टी 18250-18200 च्या दिशेने जाऊ शकतो.

Today's Stock Market Updates | Share Market News
Share Market: आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

कोटक बॉँक (KOTAKBANK)
रोल इंडिया (COALINDIA)
एचडीएफसी (HDFC)
हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
टीसीएस (TCS)
एचडीएफसी बँक (HDFCBANK)
पीएनबी (PNB)
बँक ऑफ बडोदा (BANKBARODA)
आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.