पोस्ट ऑफिसची सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीम (SCSS) ही एक अतिशय लोकप्रिय सेव्हिंग्स स्कीम आहे. ही स्कीम विशेषत: ज्येष्ठ नागरिकांच्या निवृत्तीनंतरच्या गरजांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेची सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की त्यात एकरकमी पैसे गुंतवावे लागतात आणि मॅच्युरिटीनंतर तुम्हाला दर तिमाहीत व्याज मिळते. बाजारात कितीही चढ-उतार झाले तरी तुमच्या पैशावर कोणताही परिणाम होत नाही.
हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...
पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीमवर सरकारने 1 ऑक्टोबर 2022 पासून वार्षिक 7.6 टक्के व्याज (चक्रवाढ) केले आहे. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्ष आहे. कंपाउंडिंग कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही एकरकमी 5 लाख रुपये गुंतवल्यास, मॅच्युरिटीवर तुमचा एकूण कॉर्पस सुमारे 7.21 लाख रुपये असेल. इथे तुम्हाला व्याज म्हणून 2.21 लाख रुपये मिळतील. अशा प्रकारे, प्रत्येक तिमाहीचे व्याज 11,058 रुपये असेल. यामध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. यामध्ये एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.
SCSS अंतर्गत, 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती खाते उघडू शकते. जर एखाद्याचे वय 55 वर्ष किंवा त्याहून अधिक पण 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्याने व्हीआरएस घेतली असेल तर तो या स्कीममध्ये खाते उघडू शकतो.
SCSS अंतर्गत, ठेवीदार त्याच्या/तिच्या जोडीदारासोबत वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे एकापेक्षा जास्त खाती सुरु करु शकतो. पण सर्व मिळून गुंतवणुकीची कमाल मर्यादा 15 लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही.
या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करू शकता. या स्कीममधील व्याज उत्पन्न करपात्र आहे. जर तुमच्या सर्व SCSS चे व्याज उत्पन्न वार्षिक 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुमचा टीडीएस कापला जाऊ लागतो. कराची रक्कम तुमच्या व्याजातून वजा केली जाते. जर व्याज उत्पन्न दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसेल, तर तुम्ही फॉर्म 15G/15H सबमिट करून TDS मधून सूट मिळवू शकता.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.