पोस्ट ऑफिसच्या अनेक स्मॉल सेव्हींग स्कीम्स आहेत, ज्यात पैसे गुंतवून तुम्ही मोठा फंड तयार करु शकता. आज आम्ही तुम्हाला एका स्कीमबाबत सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही दरमहा 5000 रुपये जमा करून लाखोंचा फंड तयार करु शकता. ही पोस्ट ऑफिसची 5 वर्षांची रिकरींग डेपोझिट स्कीम आहे.
सध्या यावर 5.8 टक्के दराने वार्षिक व्याज मिळते. कॅलक्युलेशन तिमाही आधारावर केले जाते. यामध्ये किमान 100 रुपये जमा करता येतात. 1 एप्रिल 2020 पासून सरकारने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. सिंगल आणि जास्तीत जास्त 3 जणांसह जॉईंट अकाऊंट सुरु करता येते. (Post Office Scheme earn profit of lakhs Rs )
समजा तुम्ही दरमहा 5000 रुपये जमा करत असाल, तर आरडी कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला पुढील पाच वर्षांत एकूण 3 लाख 48 हजार 480 रुपये 5.8 टक्के व्याजदराने मिळतील. तुमची जमा केलेली रक्कम 3 लाख रुपये असेल, ज्यावर तुम्हाला सुमारे 16% परतावा मिळेल. नियमानुसार ही योजना 5 वर्षांसाठी वाढवता येते.
यात 10 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 8 लाख 13 हजार 232 रुपये मिळतील. एकूण जमा रक्कम 6 लाख रुपये असेल. अशा प्रकारे निव्वळ परतावा अर्थात नेट रिटर्न 35% पेक्षा जास्त असेल.
जर तुमचे रिकरिंग डिपॉझिट खाते असेल, तर 12 महिने पैसे डिपॉझिट केल्यानंतर तुम्हाला कर्जाचीही मिळते. कर्जाची रक्कम एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये जमा केली जाऊ शकते. कर्जाचा व्याजदर आरडी रिटर्न रेटपेक्षा 2 टक्के जास्त असेल. मुदतपूर्तीपर्यंत कर्जाची परतफेड न केल्यास, मुदतपूर्तीच्या व्याजासह कर्जाची रक्कम वजा केली जाईल आणि बाकी रक्कम दिली जाईल.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.