Post Office Scheme : फक्त 299 रुपयांच्या गुंतवणुकीत मिळणार 10 लाखांचा फायदा

आयुष्यात कोणती घटना कधी घडेल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत सध्याच्या काळात अपघात विमा संरक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Indian post
Indian post sakal
Updated on

आयुष्यात कोणती घटना कधी घडेल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत सध्याच्या काळात अपघात विमा संरक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. अपघात विमा संरक्षणामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि स्वतःला देखील सुरक्षित करू शकता. सध्या उपघातांचे प्रमाण वाढत असल्यामुळे अपघात विमा संरक्षण घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. पोस्ट ऑफिसच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने (India Post Payment Bank) नागरिकांसाठी समूह अपघात विमा संरक्षण (Group Accidental Insurance Cover) ही नवीन विमा पॉलिसी आणली आहे. या अपघाती विमा संरक्षणाद्वारे, तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते.

Indian post
Twitter Acquired : एलोन मस्क आणि पराग अग्रवाल यांच्यात शत्रुत्व? वाचा काय आहे प्रकरण

महत्त्वाचे म्हणजे, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने टाटा एआयजी (Tata AIG) सोबत करार केला आहे. याद्वारे ते लोकांना समूह विमा संरक्षणाची सुविधा देत आहेत. या विमा संरक्षणाद्वारे, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळू शकते. यामध्ये पॉलिसीधारक किंवा त्याच्या कुटुंबाला अपघाती मृत्यू आणि अपघातामुळे आंशिक किंवा पूर्ण अपंगत्व आल्यावर 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. १८ ते ६५ वयोगटातील लोक या विमा पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या विमा संरक्षणाचा लाभ फक्त इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांनाच उपलब्ध आहे.

Indian post
RBI Meeting : महागाई रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर RBI ने घेतला 'हा' निर्णय

विमा कंपनी लोकांच्या गरजेनुसार विमा संरक्षण देत असते. अपघाती विम्याचे अनेक प्रकार आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँक आपल्या ग्राहकांना समूह अपघाती विमा सुविधा देते. या विमा संरक्षणामध्ये, पॉलिसीधारक आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला अपघात विमा संरक्षण मिळतो. तुम्ही 299 रुपये शुल्क भरून 10 लाख रुपयांपर्यंतचे सामूहिक अपघात विमा संरक्षण मिळवू शकता.

 या परिस्थितीत विमा संरक्षण मिळू शकत नाही :

 • व्यक्तीने आत्महत्या केल्यास विमा संरक्षण उपलब्ध नसते.

• लष्करी सेवेत किंवा ऑपरेशनमध्ये झालेला मृत्यू.

• युद्धादरम्यान मृत्यू.

• एड्समुळे मृत्यू

• कोणत्याही प्राणघातक खेळामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विम्याचा लाभ मिळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.