आर्थिक वर्ष २०२०-२१ संपत आले असताना, प्राप्तिकर वाचविण्यासाठी शेवटचे फक्त १५ दिवस बाकी आहेत. अशा वेळी आर्थिक नियोजनाचा मूलभूत पाया समजल्या जाणाऱ्या इन्शुरन्स योजनांमध्ये सहभागी करून ही संधी साधता येऊ शकते. करबचतीबरोबरच विमा संरक्षण असा दुहेरी लाभ या योजनांच्या माध्यमातून घेता येऊ शकेल. या योजनांमध्ये येत्या ३१ मार्चपर्यंत गुंतवणूक केल्यास करबचत करता येईल.
प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत टर्म इन्शुरन्स; तसेच पारंपरिक गुंतवणूक योजना, युलिप, एंडॉमेंट यांसारख्या योजनांमध्ये दीड लाखांपर्यंतची गुंतवणूक करून करबचत करता येऊ शकते. एकीकडे शेअर बाजारातील अनिश्चितता आणि जोखीम, तर दुसरीकडे मुदत ठेवींसारख्या निश्चित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांमधून कमी झालेला परतावा या पार्श्वभूमीवर आयुर्विमा योजना फायदेशीर ठरतात. करबचतीबरोबरच गुंतवणूक रकमेच्या किमान १० पट विमा संरक्षण देखील मिळत असल्याने तिहेरी फायदा होतो.
आरोग्यविमा हवाच!
कलम ८० डी अंतर्गत संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विम्याचे कवच घेऊन ५० हजार रुपयांपर्यतची करबचत करता येऊ शकेल. कलम ८० डी अंतर्गत स्वतः आणि कुटुंबासाठी (पती-पत्नी आणि मुले) आरोग्य विमा घेतल्यास २५ हजार रुपयांपर्यंत सवलत मिळते. पालकांसाठी आरोग्य विमा घेऊन अतिरिक्त २५ हजार रुपयांची सूट मिळू शकते. पालक जर ज्येष्ठ नागरिक असतील तर ही मर्यादा ३० हजार रुपये आहे. कोविड-१९ चे संकट पुन्हा वाढताना दिसत आहे. कुटुंबाला आर्थिक नुकसानीपासून वाचविण्यासाठी कोविड आजाराच्या खर्चाला संरक्षण देऊ शकेल अशी चांगली आरोग्य विमा योजना असणे आवश्यक आहे. अशावेळी आरोग्य विमा आणि करबचत असा दुहेरी लाभ मिळविता येऊ शकेल.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘मिस-सेलिंग’पासून सावधान!
ग्राहकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन मार्च महिन्यातील ‘बिझनेस टार्गेट्स’ पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्षात विमा कंपनीकडून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा जास्त परतावा दाखवून चुकीच्या पद्धतीने विमाविक्री होत असल्याचे सर्रास आढळून येते. त्यामुळे कोणत्याही योजनेत सहभागी होण्यापूर्वी विश्वासार्ह सल्ला मिळणे आवश्यक असते. अशा सल्ल्यासाठी ‘सकाळ मनी’च्या ७३५०८ ७३५०८ या दूरध्वनी क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि तुमचे नाव रजिस्टर करा. ‘सकाळ मनी’चे सर्टिफाईड सल्लागार आणि विमा तज्ज्ञ तुमच्याशी संवाद साधून योग्य मार्गदर्शन करतील.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.