शुक्रवारी 14 ऑक्टोबरला बाजारात चांगली तेजी दिसून आली. पण शेवटच्या तासात झालेल्या विक्रीमुळे बाजार वरच्या स्तरावरून खाली बंद झाला. पण व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 684.64 अंकांच्या म्हणजेच 1.20 टक्क्यांच्या वाढीसह 57,919.97 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 171.35 अंकांच्या म्हणजेच 1.01 टक्क्यांच्या वाढीसह 17,185.70 वर बंद झाला. पण मागच्या आठवड्याचा विचार केल्यास सेन्सेक्स 0.46 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला, तर निफ्टी 0.74 टक्क्यांनी घसरला. (Pre Analysis Of Share Market Update)
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
निफ्टीने 17000-16950 च्या सपोर्ट झोनमधून चांगली तेजी घेतल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. तर आवर्ली चार्टवर ट्रायंग्युलर पॅटर्नमधून ब्रेकआउट दिल्याचे दिसून आले आणि डेली मूविंग एव्हरेज पार केली. पण निफ्टीला सुरुवातीचा नफा कायम राखला नाही आणि शेवटच्या ट्रेडिंग तासात विक्री झाल्यामुळे तो घसरला. तर निफ्टी अजूनही कंसोलिडेशनच्या टप्प्यात आहे. निफ्टी पुन्हा एकदा 17050 च्या पातळीवर उतरू शकतो. वरच्या बाजूने, 17350 वर निफ्टीसाठी शॉर्ट टर्म रझिस्टन्स दिसत आहे.
सध्या संपूर्ण जगात महागाईच्या आकड्यांवर लक्ष असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे एस रंगनाथन यांनी सांगितले. यूएस चलनवाढीच्या आकडेवारीनंतर यूएस मार्केटमध्ये प्रचंड अस्थिरता होती असेही ते म्हणाले.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
इन्फोसिस (INFOSYS)
एचडीएफसी बँक (HDFCBANK)
एचडीएफसी (HDFC)
एचसीएल टेक (HCLTECH)
आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
लॉरस लॅब (LAURUSLAB)
ए यू बँक (AUBANK)
एल अँड टी सर्व्हिसेज लिमिटेड (LTTS)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.