बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

निफ्टीने 15660-15700 चा महत्त्वाचा सपोर्ट तोडल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. ही पातळी आता निफ्टीसाठी रझिस्टंस बनली आहे.
Share
ShareSakal
Updated on

गेल्या 5 दिवसांपासून सेन्सेक्स, निफ्टीमध्ये सातत्याने घसरण होत आहे. गुरुवारीही सेन्सेक्स 1046 अंकांनी घसरून 51 हजार 400 च्या जवळ बंद झाला आहे. दुसरीकडे, निफ्टी 332 अंकांनी घसरून 15300 च्या जवळ बंद झाला आहे. BSE चे सर्व सेक्टर इंडेक्स लाल चिन्हात बंद झाले आहेत. मेटल आणि फार्मा निर्देशांक इंडेक्स वर्षाच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. सर्वात मोठी घसरण मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये झाली आहे. आयटी, ऊर्जा, वाहन इंडेक्सही 2 टक्क्यांहून अधिक घसरलेत.

Share
Share Market: रुस्तमजी ग्रुपच्या कीस्टोन रियल्टर्सचा IPO येण्याची शक्यता

सेन्सेक्स, निफ्टी 52 आठवड्यांच्या निचांकी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स 1,046 अंकांनी घसरून 51496 वर बंद झाला. तर निफ्टी 332 अंकांनी घसरून 15,361 वर बंद झाला. निफ्टी बँक 722 अंकांनी घसरून 32617 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 629 अंकांनी घसरून 26,180 वर बंद झाला. निफ्टीचे 50 पैकी 47 शेअर्स घसरले. त्याचवेळी सेन्सेक्समधील 30 पैकी 29 शेअर्सची विक्री झाली. निफ्टी बँकेचे सर्व 12 शेअर्स दबावाखाली राहिले.

निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावरून 20 टक्क्यांहून अधिक घसरली. त्याच वेळी, मिडकॅप इंडेक्स विक्रमी उच्चांकावरून 20 टक्क्यांनी घसरला. निफ्टीचे 9 शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स, निफ्टी विक्रमी उच्चांकावरून जवळपास 17 टक्क्यांनी घसरलेत.

Share
बचत खाते पंतप्रधान जन धन योजनेशी जोडल्यास सरकारकडून मिळतील असे लाभ

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

निफ्टीने 15660-15700 चा महत्त्वाचा सपोर्ट तोडल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. ही पातळी आता निफ्टीसाठी रझिस्टंस बनली आहे. कोणत्याही घसरणीत, निफ्टीला 15315 वर थोडा सपोर्ट मिळू शकतो. हा सपोर्टही तुटला तर निफ्टी पुढील काही दिवस किंवा आठवड्यात 14340 च्या दिशेने जाऊ शकतो. व्याजदरात वाढ होण्याच्या बाजारात नकारात्मक परिणाम होतो आहे. त्यामुळे मंदीची भीती निर्माण झाली आहे.

Share
'फेड'च्या निर्णयाचा Share Market ला फटका, Sensex 1045 अंकानी घसरला

आजच टॉप 10 शेअर्स कोणते ?

हिन्दाल्को (HINDALCO)
टाटा स्टील (TATASTEEL)
ओएनजीसी (ONGC)
कोल इंडिया (COALINDIA)
टाटा मोटर्स (TATAMOTORS)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
लॉरस लॅब (LAURUSLABS)
एल अँड टी (LTTS)
व्होल्टास (VOLTAS)
आयआरसीटीसी (IRCTC)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.