बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

मजबूत जागतिक संकेतांच्या आधारे सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.
share market update
share market updategoogle
Updated on

मंगळवारी शेअर बाजारात जोरदार रिकव्हरी झाली. सकारात्मक जागतिक संकेत आणि सर्व क्षेत्रातील खरेदी यामुळे निफ्टी 17200 च्या वर बंद होण्यात यशस्वी झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 1276.66 अंकांच्या म्हणजेच 2.25 टक्क्यांच्या वाढीसह 58065.47 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 386.95 अंकांच्या अर्थात 2.29 टक्क्यांच्या वाढीसह 17274.30 वर बंद झाला. दसर्‍यानिमित्त काल अर्थात 5 ऑक्टोबरला बाजार बंद होता.

share market update
Stock: 34 वरुन थेट 586 रुपयांवर, या शेअरने दिला 1,600% रिटर्न...

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

मंगळवारी बाजारात चांगली रिकव्हरी झाल्याचे बीएनपी परिबाचे गौरव रत्नपारखी यांनी सांगितले. पुढे निफ्टीसाठी 17300 वर पहिला रझिस्टंस दिसत आहे. जोपर्यंत निफ्टी हा रझिस्टंस पार करत नाही तोपर्यंत यात कंसोलिडेशन दिसू शकते असे ते म्हणाले. जर निफ्टीने क्लोजिंग बेसिसवर 17300 पार केले तर यामध्ये 17500 ची पातळी पाहू शकतो. आता निफ्टीला 17000 वर सपोर्ट दिसत आहे.

मजबूत जागतिक संकेतांच्या आधारे सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. तांत्रिक दृष्टीकोनातून, निफ्टीने तीव्र इंट्राडे करेक्शननंतर चांगला बाउन्सबॅक पाहिला. वाढीसह उघडल्यानंतर, सेन्सेक्स-निफ्टी 17100/57500 ची पातळी राखण्यात यशस्वी झाला आणि त्याच्या वर बंद झाला. मंगळवारी इंट्राडे चार्टवरही हायर बॉटम फॉर्मेशन दिसले, जे येत्या काळात तेजीचा कल कायम राहण्याचे संकेत देत आहेत.

share market update
Sugar Stock: फक्त 55 रुपयांचा 'हा' स्टॉक वाढवेल तुमच्या पोर्टफोलिओची गोडी

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

इंडसइंड बँक (INDUSINDBANK)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
बजाज फायनान्स (BAJAJFINANCE)
कोल इंडिया (COALINDIA)
टीसीएस (TCS)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTBANK)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
पेज इंडिया (PAGEINDIA)
झिंदाल स्टील (ZINDALSTEEL)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTORS)


नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.