मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजारात कमजोरी दिसून आली. डॉलरची मजबूती, कमकुवत जागतिक संकेत, यूएस फेडकडून व्याजदर वाढीची शक्यता आणि यूएस चलनवाढीच्या आकडेवारीपूर्वी बाजारातील भीती या काही कारणांमुळे बाजारावर परिणाम झाला.
व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 508.62 अंकांनी म्हणजेच 0.94 टक्क्यांनी घसरून 53,886.61 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 157.70 अंकांनी म्हणजेच 0.97 टक्क्यांनी घसरून 16,058.30 वर बंद झाला.
आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?
निफ्टी 16150 आणि सेन्सेक्स 54200 च्या खाली घसरला तर बाजाराचा शॉर्ट टर्म कल ट्रेडर्ससाठी कमकुवत होईल आणि निफ्टी 16000-15950 आणि सेन्सेक्स 53700-53500 ची लेव्हल दिसू शकले असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. दुसरीकडे, जर निफ्टी 16150 च्या वर आणि सेन्सेक्स 54200 च्या वर राहिला तर निफ्टी मध्ये 16225-16250 आणि सेन्सेक्स मध्ये 54500-54600 ची लेव्हल दिसू शकते.
13 जुलै रोजी बाजार सुरुवातीच्या व्यापारात भारत आणि अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीवर रिऍक्ट करेल असे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. याशिवाय काही आयटी कंपन्यांच्या कमाईचे आकडेही फोकसमध्ये असतील. अशा परिस्थितीत, बाजारातील सकारात्मक कल असलेल्या निवडक शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
एनटीपीसी (NTPC)
कोल इंडिया (COALINDIA)
श्री सिमेंट (SHREECEM)
भारती एअरटेल (BHARTIARTL)
बजाज फायनान्स (BAJAJFIN)
आयशर मोटर्स (ICHERMOTORS)
हिन्दाल्को (HINDALCO)
इन्फोसिस (INFY)
बीपीसीएल (BPCL)
ग्रासिम (GRASIM)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.