यूएस फेडच्या व्याजदराच्या निर्णयापूर्वी बाजारात व्यापारी आणि गुंतवणूकदार सावध दिसून आले. सेन्सेक्स-निफ्टी बुधवारी एका रेंजमध्ये व्यवहार करताना दिसले. शेवटी सेन्सेक्स 144.61 अंकांच्या म्हणजेच 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 62,677.91 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 52.30 अंकांच्या किंवा 0.28 टक्क्यांच्या वाढीसह 18,660.30 वर बंद झाला. (pre analysis of share market update 15 December 2022)
बँकिंग शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीच्या जोरावर बँक निफ्टी 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 44,049.10 च्या पातळीवर बंद झाला. बुधवारी खासगी आणि सरकारी बँकांमध्ये खरेदी दिसून आली. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 0.56 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याच वेळी, खासगी बँक निर्देशांक 0.43 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
यूएस एफओएमसी बैठकीच्या निर्णयापूर्वी बाजार सावध दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. निवडक मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. तांत्रिक दृष्टीकोनातून, निफ्टीने डेली चार्टवर एक बुियरीश कँडल बनवली, ज्यामुळे बाजार कोणत्या दिशेने जाईल हे स्पष्ट नाही.
निफ्टीसाठी 18700 वर वरच्या बाजूने रझिस्टंस दिसत आहे. जर निफ्टीने हा अडथळा पार केला तर त्यात 18800-18850 पातळी दिसू शकते. दुसरीकडे, निफ्टी 18620 च्या सपोर्टच्या खाली गेला तर तो 18520-18475 पर्यंत वाढू शकतो.
निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग दिसून आल्याचे शेअर खानचे गौरव रत्नपारखी यांनी सांगितले. मात्र, सर्व प्रयत्न करूनही सुरुवातीच्या मजबूतीचा फायदा उठवता आला नाही. निफ्टीच्या ओवरऑल स्ट्रक्चरमधून लक्षात येते की तो अजूनही शॉर्ट टर्म कंसोलिडेशनच्या फेजमध्ये आहे आणि पुढील काही ट्रेडिंग सत्रांसाठी 18700-18300 या रेंजमध्ये व्यापार करू शकतो.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
हिन्दाल्को (HINDALCO)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
ओएनजीसी (ONGC)
युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
एल अँड टी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
ज्युबिलंट फूड्स (JUBLFOOD)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.