बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

आता जोपर्यंत निफ्टी 17400 च्या वर राहील तोपर्यंत तो पॉझिटीव्ह ट्रेंडमध्ये राहील.
Share Market
Share Marketesakal
Updated on

मंगळवारी सलग दोन दिवसांंची बाजारातील घसरण थांबली आणि सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या चिन्हात बंद झाले. ऑटो, बँक, मेटल, ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये खरेदीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला. शेवटी, सेन्सेक्स 257.43 अंकांच्या अर्थात 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 59,031.30 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 86.80 अंकांनी अर्थात 0.50 टक्क्यांनी वाढून 17,577.50 वर बंद झाला.

Share Market
Share Market: मोठ्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार सावरला, Sensex 257 तर Nifty 86 अंकांनी वाढला

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

मंगळवारी बाजारात प्रचंड अस्थिरता होती असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. मंगळवारी इंट्राडेमध्ये सेन्सेक्स 1000 अंकांच्या रेंजमध्ये फिरताना दिसला. व्यवहाराच्या शेवटी बँकिंग, ऑटो, मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये खरेदीमुळे बाजारात रिकव्हरी दिसून आली.

तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केल्यास गॅपडाउन ओपनिंगनंतर निफ्टीने 20-दिवसांच्या SMA जवळ सपोर्ट घेतला आणि तिथून पुन्हा जोरदार उसळी घेतली. याशिवाय निफ्टीने डेली चार्टवर बुलिश कँडल तयार केली आहे. पण, निफ्टीचे शॉर्ट टर्म फॉर्मेशन अजूनही कमजोर आहे. जर निफ्टी 17500 च्या वर ट्रेड करत असेल तर पुलबॅक रॅली चालू राहू शकते आणि निफ्टी 17700-17750 च्या दिशेने दिसू शकतो असे संकेत इंट्राडे सेटअपमधून मिळत आहेत.

Share Market
Stock Split: स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमकं काय? शेअरहोल्डरला कसा होतो फायदा?

निफ्टीने दिवसाचा शेवट चांगला केल्याचे LKP सिक्युरिटीज सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. खाली निफ्टी त्याच्या निअर टर्म मूव्हिंग एव्हरेजजवळ सपोर्ट दाखवत आहे. आता जोपर्यंत निफ्टी 17400 च्या वर राहील तोपर्यंत तो पॉझिटीव्ह ट्रेंडमध्ये राहील. पण, वरच्या बाजूस, निफ्टीसाठी 17700 वर रझिस्टंस आहे. निफ्टीने ही पातळी ओलांडल्यास ही रॅली 18000 च्या दिशेने जाऊ शकते.

Share Market
Stock market closing update : शेअर बाजार घसरणीसह बंद

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • टायटन (TITAN)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • ट्रेंट (TRENT)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.