बुधवारी सलग 4 दिवसांच्या तेजीला अखेर ब्रेक लागला. बाजारात नफावसुलीचा दबाव होता. त्यामुळे सेन्सेक्स 215 अंकांनी घसरून 60906 वर तर निफ्टी 63 अंकांनी घसरून 18083 वर बंद झाला.
रिऍल्टी, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये विक्री झाली. दुसरीकडे मेटल आणि फार्मा शेअर्समध्ये खरेदी झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स दबावाखाली राहिले. (Pre Analysis of Share Market)
निफ्टी बँक 143 अंकांनी घसरून 41147 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 26 अंकांनी घसरला आणि 31680 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 22 शेअर्सची विक्री झाली. त्याचवेळी निफ्टीच्या 50 पैकी 32 शेअर्सची विक्री झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 9 शेअर्सची विक्री झाली.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
सुमारे 1 आठवड्याच्या मजबूत तेजीनंतर बुधवारी यूएस फेडच्या निर्णयापूर्वी बाजार सुस्त दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. यूएस फेडने अपेक्षेपेक्षा जास्त व्याजदर वाढवल्यास जागतिक बाजारपेठेत मोठी घट होण्याची शक्यता असल्याने काउंटरमधील काही व्यापाऱ्यांनी नफा बुक केला.
डेली चार्टवर निफ्टीने इंट्राडे चार्टवर डबल टॉप फॉर्मेशनसह एक लहान बियरीश कँडल तयार केली. आता निफ्टीला 18000 आणि 17950 वर सपोर्ट दिसत आहे. तर 18200-18250 साठी, त्याच्यासाठी रझिस्टंस आहे.
बुधवारी निफ्टी वाढीसह उघडला, मात्र सुरुवातीची गती कायम राखता न आल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. डेली चार्टवर, निफ्टीने इनगलफिंग कँडलसह बियरिश आउटसाइड बार तयार केला. त्यामुळे आता 18178 हा दिवसाचा उच्चांक निफ्टीसाठी महत्त्वाचा रझिस्टंस बनला आहे.
आवर्ली चार्टमधूनही बाजारात पुन्हा एकदा कमजोरीचे चिन्हे दिसत आहेत. आता 18000 ची पातळी पुढे जाण्यासाठी निफ्टीसाठी मेक किंवा ब्रेक पातळी असेल. जोपर्यंत निफ्टी 18000 च्या वर राहील तोपर्यंत बाजाराचा शॉर्ट टर्म कल सकारात्मक राहील. दुसरीकडे, जर निफ्टीने क्लोजिंग आधारावर 18000 ची पातळी तोडली, तर तो पुन्हा एकदा कंसोलिडेशन मोडमध्ये जाऊ शकतो.
आज अर्थात 3 नोव्हेंबरला आरबीआय आपली आउट ऑफ टर्न बैठक आयोजित करणार आहे. पतधोरण समितीला व्याजदर 2 ते 6 टक्क्यांच्या उद्दिष्टात ठेवण्यात अपयश आले आहे. अशा स्थितीत बाजारातील काही लोकांचे मत आहे की, या बैठकीत आरबीआय आपले व्याजदर वाढवू शकते.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
भारती एअरटेल (BHARTIARTL)
अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)
मारुती (MARUTI)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
ब्रिटानिया (BRITANNIA)
ट्रेंट (TRENT)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
ज्युबिलंट फुड्स (JUBLFOOD)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.