Share Market : अर्थसंकल्पीय आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात अस्थिरता दिसून आली. सोमवारी सेन्सेक्स 170 अंकांनी वाढून 59500 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी 45 अंकांनी वाढून 17649 वर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये दबाव दिसून आला. एनर्जी, पीएसई आणि एफएमसीजी शेअर्सची विक्री झाली.
रियल्टी आणि इन्फ्रा शेअर्सवरही दबाव होता. मात्र, आयटी शेअर्समध्ये खरेदी झाली. निफ्टी बँक 42 अंकांनी वाढून 40387 वर बंद झाला. त्याचवेळी मिडकॅप 56 अंकांनी घसरून 30186 च्या पातळीवर बंद झाला आहे. (pre analysis of share market update 31 January 2023)
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
बाजार चढ-उताराच्या दरम्यान किंचित वाढीसह बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. शुक्रवारच्या घसरणीनंतर बाजाराने सुटकेचा नि:श्वास सोडला. बाजार लाँग टर्म मूव्हिंग एव्हरेजचा (200 EMA) सपोर्ट झोन कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण निफ्टी 18000 ची पातळी पुन्हा मिळवत नाही किंवा यात रिव्हर्स पॅटर्न तयार होईपर्यंत नेगिटीव्ह कल कायम राहिल.
निफ्टीने 17400 च्या आसपास सपोर्ट घेत जोरदार पुनरागमन केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. शेअर बाजाराचा शॉर्ट टर्म ट्रेंड अजूनही कमकुवत आहे. पण जर निफ्टी 17550 च्या वर टिकून राहिला तर पुलबॅक रॅली दिसू शकते. या रॅलीमध्ये निफ्टी 17750-17800 पर्यंत जाताना दिसेल. जर निफ्टी 17550 च्या खाली गेला तर त्यात 17400 - 17350 पातळी दिसू शकते.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
पॉवरग्रीड (POWERGRID)
बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)
इंडसइंड बँक (INDUSINDBK)
एल अँड टी (LT)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
झिंदाल स्टील (JINDALSTEL)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.