Morgan-Stanley
Morgan-Stanley

मॉर्गन स्टॅनलीचं भारतीय शेअर बाजाराबाबत महत्वाचं भाकीत!

Published on

मॉर्गन स्टॅनली या संस्थेने भारतीय शेअर बाजाराबाबत एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. मॉर्गन स्टॅनली या संस्थेच्या माहितीनुसार, भारतीय शेअर बाजारातील सध्याचा बुल रन हा 2003 ते 2008 दरम्यानच्या बुल रन सारखाच पाहायला मिळतोय. त्यामुळे येत्या काही महिन्यात आपल्याला भारतीय शेअर बाजारात अधिक वाढ होताना पाहायला मिळू शकते. (prediction of morgan stanley about indian share market and expected extended bull run)

Morgan-Stanley
सरनाईकांच्या 'लेटरबॉम्ब'नंतर महाविकास आघाडीची मंगळवारी बैठक

महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या आठवड्यात निफ्टीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. 15 हजार 900 च्या उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर निफ्टी 15 हजार 750 च्या अगदी जवळ बंद झाला. जो आपल्या उच्चांकावरून जवळपास 2 टक्के मंदी दर्शवत होता.

Morgan-Stanley
EDची मोठी कारवाई; अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त

मॉर्गन स्टॅनलीच्या या अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, "भारतीय बाजारपेठेत सध्या चालू असलेला बुल रन हा आपल्याच इतिहासाची पुनरावृत्ती करताना पाहायला मिळतोय. जर असंच राहिलं तर 2003 ते 2008 प्रमाणेच भारतीय शेअर बाजारात आणखी तेजीचे दिवस आपण पाहू शकतो. या अहवालात पुढे म्हटले आहे की, गेल्या पाच बुल रनमध्ये भारतीय शेअर बाजाराने इतर देशांच्या तुलनेत उत्तम कामगिरी बजावलेली पाहायला मिळाली आहे. जेव्हा इंडेक्स किंवा शेअर बाजार आपल्या निच्चांकी पातळीवरून दुप्पट होतो अशा स्थितीला मॉर्गन स्टॅनली बुल रन मानतात. मागील तीन दशकांमध्ये भरतोय शेअर बाजारात अशा प्रकारचे सहा बुल रन आलेले पाहायला मिळाले आहेत. यामध्ये सध्याच्या बुल मार्केटचा देखील समावेश आहे.

Morgan-Stanley
योगाभ्यासाचं मूळ नेपाळमध्ये भारतात नव्हे; पंतप्रधान ओलींचा दावा

मॉर्गन स्टॅनली आपल्या अहवालात सांगतात की, आपण 2003 ते 2008 हा कालावधी वगळला तर उरलेल्या ४ बुल रन मध्ये मार्केट ७२ आठवडे वधारताना पाहायला मिळालं आहे. अशात सध्याच्या रनमधील ६४ आठवडे संपलेले आहेत. नव्या नफा चक्रानुसार, भारतीय शेअर मार्केटमधील तेजी 2003 ते 2008 ची कॉपी करू शकते. म्हणजेच सध्याची भारतीय बाजारातील तेजी ही त्याच्या सरासरी (72 आठवड्यांच्या) तेजीच्या कालावधीपेक्षा जास्त असू शकते. भारतीय बाजारपेठेतील अपट्रेन्ड हा पुढील १२ महिन्यांसाठी कायम राहू शकतो. मात्र, याची गती काही प्रमाणात हळू असू शकते.

बुल रन म्हणजे काय ?

बुल रन म्हणजे शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी तेजी तसेच बेअर रन म्हणजे शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी मंदी असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()