विमा योजनांचा प्रीमियम नरेंद्र मोदी सरकारने हळूच वाढवला

सर्वसामान्यांच्या, विशेषतः गरीबांच्या आवाक्यातील विमा योजना, अशी जाहिरात करून सुरू केलेल्या दोन विमा योजनांच्या वार्षिक हप्त्यांमध्ये (प्रिमियम) नरेंद्र मोदी सरकारने मंगळवारी हळूच वाढ केली.
insurance  Scheme
insurance SchemeSakal
Updated on
Summary

सर्वसामान्यांच्या, विशेषतः गरीबांच्या आवाक्यातील विमा योजना, अशी जाहिरात करून सुरू केलेल्या दोन विमा योजनांच्या वार्षिक हप्त्यांमध्ये (प्रिमियम) नरेंद्र मोदी सरकारने मंगळवारी हळूच वाढ केली.

नवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या, विशेषतः गरीबांच्या आवाक्यातील विमा योजना, अशी जाहिरात करून सुरू केलेल्या दोन विमा योजनांच्या वार्षिक हप्त्यांमध्ये (प्रिमियम) नरेंद्र मोदी सरकारने मंगळवारी हळूच वाढ केली. उद्यापासून (ता.१ जून) ही वाढ अंमलात येईल.

दोन्ही विमा योजनांत गुंतवणूक केलेल्या ग्राहाकंची संख्या अनुक्रमे साडेसहा कोटी व २२ कोटी इतकी आहे, हे लक्षात घेतल्यास वाढीव हप्त्यांद्वारे केंद्राच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होणार हे स्पष्ट आहे.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएम जेजेपी वाय) व पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) या दोन योजना मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी विमा योजना आहेत. गरीब वर्गाला त्यांना परवडेल इतक्या माफक दरांचे वार्षिक हप्ते भरून या योजनांचा लाभ देण्यात येईल असे सरकारचे म्हणणे आहे. एकदा या योजनांसाठी नोंदणी केली की दरवर्षी तुमच्या बॅंक खात्यांतून तेवढे पैसे ठराविक तारखांना कापून घेतले जातात. या कपातीची धड माहितीही बॅंकांच्या वतीने ग्राहकांना देण्यात येत नाही असाही अनेक नागरिकांचा अनुभव आहे. केंद्र सरकारने यातील पीएम जेजे बी वाय योजनेचा हप्ता दरदिवशी सव्वा रूपया केला आहे. म्हणजेच याचा वार्षिक हप्ता आता ३३० रूपयांवरून ४३६ रूपये झाला आहे. सुरक्षा विम्याबाबतच्या पीएमएसबीवाय योजनेचा हप्ताही १२ रूपयांवरून २० रूपये करण्यात आला आहे. दोन्ही योजनांच्या हप्त्यातील वाढ अनुक्रमे ३२ टक्के व ६७ टक्के आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()