तुम्ही वर्षाचं टॅक्स प्लॅनिंग करता? नसेल तर दहा टिप्स फॉलो करा!

income tax
income tax
Updated on

कोरोना आला, त्यानं सगळं जग बदललं. कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी, अर्थिक गोष्टी हळू हळू स्थिरावत आहेत. कोरोनाच्या काळात काही कर्मचाऱ्यांना निम्म्या पगारावर काम करावं लागलं. आता, पगार पुन्हा सुरळीत होत आहेत. त्यामुळं इथून पुढचं आर्थिक नियोजन महत्त्वाचं आहे. त्यात टॅक्स प्लॅनिंग अतिशय काटेकोरपणे करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही येथे तज्ज्ञांचे सल्ले देत आहोत. टॅक्स प्लॅनिंग करताना, तुमची नेमकी मिळकत किती आहे हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

1) ईपीएफमधील गुंतवणूक : ईपीएफ (एम्प्लॉईज् प्रॉव्हिडंट फंड) हा कर्मचाऱ्यांसाठी सगळ्यांत चांगला टॅक्स सेव्हिंग प्लॅन आहे. ईपीएफमध्ये कर्चमारी आणि कंपनी दोघांचे योगदान असते. आता कलम 80 सीनुसार ईपीएफमधील योगदान की करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच जर, एखाद्या कर्मचाऱ्याची पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा झाली असेल तर, त्याने काढून घेतलेला प्रॉव्हिडंट फंड हा करमुक्त असणार आहे.

2) पीपीएफमधील गुंतवणूक : ईपीएफप्रमाणेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) हादेखील कर वाचवण्यासाठीचा उत्तम पर्याय आहे. हमखास रिटर्न मिळवण्यासाठी किंवा निवृत्तीसाठीचा प्लॅन म्हणून याकडं पाहिलं जातं. कलमी 80-सीनुसार पीपीएफमधील गुंतवणूक ही, कर वजा करण्यायोग्य असते. त्यामुळं पगारदार कर्मचाऱ्यांनी टॅक्स प्लॅनिंगमध्ये पीपीएफचा समावेश करावा. 

3) कर पात्र आणि कर अपात्र मिळकत : कर पात्र आणि कर अपात्र मिळकत अर्थात टॅक्सेबल आणि नॉन टॅक्सेबल इन्कम जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यानुसार तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स वाढवता येऊ शकतात. अशा प्रकारचं नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे कारण, सरकार नॉन टॅक्सेबल इन्कमची व्याख्या स्पष्ट करत आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातही टॅक्सेबल आणि नॉन टॅक्सेबल इन्कम स्पष्ट केलेला असतो. त्यामुळं तुमचं टॅक्स प्लॅनिंग करताना, एकदा तुमच्या सॅलरी स्लिपवर बारकाईनं नजर टाका. कोणत्या सेक्शननुसार तुम्हाला पगार दिला जातो याची माहिती घ्या. कारण पे स्लीपमध्ये त्याची सगळी माहिती असते. तुमचा टॅक्सेबल इन्कम नेमका किती आहे, याची तुम्हाला माहिती मिळते. यासाठी तुम्ही तुमच्या एचआर टीममधून कोणाचीही मदत घेऊ शकता. 

ईपीएफ बरोबर, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ)मधील तुमचा टॅक्स वाचवू शकते. कलम 80-सी अंतर्गत तुम्हाला पीपीएफमधील गुंतवणूक कर वाचवण्याची संधी देऊ शकते. त्याचबरोबर टॅक्स सेव्हिंग डिपॉझिट्सही तुम्हाला कर वाचवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
- अनिश सरकार, सीईओ, सोडेक्स बीआरएस

4) घर भाड्याचा लाभ घ्या : जर, तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर, तुम्हाला त्याचा टॅक्स बेनिफिट घेण्याची संधी सरकार देते. जर, तुम्ही घरभाड्याची रक्कम क्लेम केली तर, तुमच्या संपूर्ण टॅक्सेबल इन्कममधून ती रक्कम कमी होते आणि तुमचे कर पात्र उत्पन्नच मोठ्या प्रमाणावर कमी होते. पण, घरभाड्याची रक्कम किती असावी, याचे एक प्रमाण आहे. त्याचीही काळजी घ्यावी लागेल. याची माहिती आपल्याला एचआर टीमकडून मिळू शकते. अर्थात हा लाभ घेताना तुम्हाला घरभाडे कराराची कागदपत्रेही जोडावी लागतात. 

5) वेगवेगळ्या कलमांची माहिती घ्या : कर वाचविण्यासाठी कोण कोणत्या कलमांचा लाभ घेता येऊ शकेल याची माहिती घ्या. यात 80सी या कलमा अंतर्गत सर्वाधिक लाभ घेतला जातात. पण, त्याचबरोबर 80डी, 80ईई, 80जी या कलमांचीही माहिती घ्या. तुम्हाला जास्तीत जास्त टॅक्स बेनिफिट घ्यायचा असेल तर या सगळ्या कलमांची माहिती घेऊन तुमचे टॅक्स प्लॅनिंग करावे लागेल. 

6) खर्चातूनही वाचतो टॅक्स : काही असे खर्च आहेत जे आपल्याला वर्षाच्या शेवटी कर वाचवून देतात. त्यात तुमच्या मुलांची ट्यूशन फी, इन्श्युरन्स प्रिमियम, चॅरिटेबल संस्थांना देण्यात आलेली देणगी यातून तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकता. त्यामुळं तुम्हाला या सगळ्या पर्यायांची माहिती असणे गरजेचे आहे. 

- अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

7) छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात करा : जर, तुम्ही नुकतेच पैसे कमवायला लागला असाल तर, तुम्ही एसआयपी सुरू करता. ईएलएसएस योजनेत तुम्ही महिन्याला एक हजार रुपये गुंतवू शकता. यातून तुमची गुंतवणूकही सुरू होईल आणि वर्षाच्या शेवटी तुम्हाला त्याचा लाभही होईल.

8) गुंतवणुकीचे पर्याय असे : पोस्टात किंवा बँकेत टॅक्स सेव्हिंग फिक्स डिपॉझिट करा. पाच वर्षांपेक्षा जास्त काळ फिक्सड् डिपॉझिट असेल तर, कलम 80-सीमधून तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळवता येतो. सुकन्या समृद्धी अकाऊंटमध्ये तुम्हाला खाते सुरू करता येईल. मुलींच्य भविष्या साठी 10 वर्षांच्या आतील मुलीच्या नावे ही गुतंवणूक करता येते. कुटुंबातील दोन मुलींसाठी ही गुतंवणूक तुम्हाला करता येईल.  नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुतंवणूक करून तुम्ही 50 हजार रुपयांचा कर वाचवू शकता.

9) अलाऊंन्स आणि कुपन्सची माहिती घ्या : कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सॅलरी कुपन्सवरूनही तुमचे टॅक्स प्लॅनिंग होऊ शकते. कारण, कंपनीकडून देण्यात येणारी फूड किंवा शॉपिंग सॅलरी कुपन्स ही टॅक्सेबल नसतात. त्यामुळे याची माहिती घ्या आणि तुमचे टॅक्स प्लॅनिंग करा.

10) एलटीए - कंपनीकडून कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा एलटीए अर्थात लिव ट्रॅव्हलिंग अलाऊन्स तुम्हाला टॅक्स बेनिफिट देऊ शकतो. अर्थात ट्रीपचा मूळ खर्चच तुम्हाला दाखवता येऊ शकतो. ट्रीप दरम्यान, करण्यात आलेले इतर खर्च मात्र, गृहित धरले जात नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.