पुणे : पल्सर ही आमच्यासाठी केवळ एक मोटारसायकल (pulsar bike) नसून आयुष्यभराचे विश्वविद्यापीठ आहे, असे भावोद्गार बजाज ऑटो चे एमडी राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांनी आज येथे काढले. बजाजच्या 250 सीसी च्या दोन नव्या मॉडेलचे (250 cc new pulsar) अनावरण करताना ते बोलत होते. रेसिंग रेड आणि टेक्नो ग्रे अशा या दोन आकर्षक मॉडेलची किंमत एक लाख 40 हजार रुपयांच्या आसपास आहे. दिसण्यास अत्यंत आकर्षक व एरोडायनामिक डिझाईनच्या या मोटरसायकल मुळे भारतातील स्पोर्ट्स मोटरसायकल (Sports bike) क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी पल्सरच्या व बजाजच्या दुचाकी मोटरसायकलच्या इतिहासाचा आढावा घेताना राजीव बजाज भावूक झाले होते. बजाज ने आम्हाला सर्व काही शिकवले, एखादा ब्रँड कसा उभारावा, कसा उभारू नये हे आम्हाला पल्सरमुळे कळले. पल्सर ने भारताला प्रथमच प्रवासी दुचाकींच्या क्षेत्रातून स्पोर्ट्स बाईक च्या रूपात परिवर्तित केले. पल्सर मुळे भारताने चाळीस वर्षानंतर प्रथमच 70 देशांमध्ये दुचाकीची निर्यात सुरू केली. पल्सर ही आमची वीस वर्षातील सर्वात मोठी गुरु आहे. किंबहुना ती आमच्यासाठी आयुष्यभराचे विद्यापीठ आहे, असेही ते म्हणाले.
स्पोर्ट्स मोटरसायकलच्या बाजारपेठेत वीस वर्षे यशस्वी नेतृत्व केल्याच्या निमित्ताने या दोन नव्या पल्सर मोटरसायकली आज बजाज तर्फे बाजारात आणण्यात आल्या. नायट्रिक सस्पेन्शन, हाताळण्यास अत्यंत सोपे असे क्लच, सुरक्षितता आणि नियंत्रण यासाठी उपयुक्त असे ताकदवान ब्रेक, रस्त्यावर चांगली पकड घेतील असे रुंद टायर अशी अनेक वैशिष्ट्ये या पल्सर मध्ये आहेत. 100 सीसी च्या इंधनाची बचत करणाऱ्या मोटरसायकलींपासून आता अत्याधुनिक स्पोर्ट्स बाईक पर्यंत आम्ही मजल मारली आहे. यापुढेही आम्ही दीडशे ते दोनशे सीसी च्या नव्या मोटरसायकली जरुर उत्पादित करू. मात्र आता त्याची घाई नाही, असेही बजाज यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.