आयपीओच्या माध्यमातून पैसे कमावण्याची संधी शोधणाऱ्यांना फारशी वाट पाहावी लागत नाहीय, कारण सध्या आयपीओची रांग लागली आहे. अशात आता रेडियंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीचा आयपीओ 23 डिसेंबरला खुला होणार आहे. (Radiant Cash Management Services ipo will open soon )
27 डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओसाठीचा प्राईस बँड अद्याप ठरलेला नाही. आज, उद्या याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी, हा आयपीओ एक दिवस आधी म्हणजेच 22 डिसेंबर रोजी उघडेल. या आयपीओअंतर्गत 60 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स जारी केले जातील.
याशिवाय, 3.31 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत कंपनीचे प्रमोटर्स आणि गुंतवणूकदार विक्रीसाठी ठेवतील.
प्रमोटर डेव्हिड देवसाहायम ओएफएसचा भाग म्हणून 1.01 कोटी शेअर्स आणि गुंतवणूकदार ऍसेंट कॅपिटल एडवायझर्स इंडिया 2.3 कोटी शेअर्स विकतील. डेव्हिड देवसाहायमकडे कंपनीत 58 टक्के हिस्सा आहे तर ऍसेंट कॅपिटलचा 33.61 टक्के हिस्सा आहे.
आयपीओ मधून मिळणारी रक्कम वर्किंग कॅपिटलसाठी वापरली जाईल. विशेषतः हा निधी फॅब्रिकेटेड आर्मर्ड व्हॅन खरेदी करण्यासाठी वापरला जाईल. याव्यतिरिक्त, सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठीही पैसे खर्च करण्याची योजना आहे.
रेडियंट भारतातील बँका, वित्तीय संस्था आणि संघटित रिटेल आणि ई-कॉमर्स कंपन्यांसाठी कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या आउटसोर्सिंग रिक्वायरमेंट पूर्ण करते. मार्च 2022 पर्यंत नेटवर्क लोकेशन्स किंवा टच पॉइंट्सबाबतीत रिटेल कॅश मॅनेजमेंट सेगमेंटमधील सर्वात मोठी कंपनी असल्याचा त्यांचा दावा आहे.
मार्च 2022 मध्ये संपलेल्या वर्षात कंपनीच्या नफ्यात 18 टक्के म्हणजेच 38.2 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त कंपनीच्या महसुलात 29 टक्क्यांनी वाढ झाली असून तो 286 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
आयआयएफएल सिक्युरिटीज, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझर्स आणि येस सिक्युरिटीज हे इश्यूचे मर्चंट बँकर आहेत, तर लिंक इनटाइम इंडिया हे रजिस्ट्रार आहेत.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.