भारतातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला तसेच आशीष कचोलिया, डॉली खन्ना, पोरिंजू वेलियथ, सुनील सिंघानिया यांची कंपनी अबॅकस फंड आणि मुकुल अगरवाल यांसारख्या दिग्गजांनी 31 मार्च 2021 रोजी समाप्त झालेल्या शेवटच्या तिमाहीत भारतीय शेअर बाजारात नवीन खरेदी केली आहे.
राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी मार्चच्या तिमाहीत ज्युबिलंट इंग्रेव्हिया Jubilant Ingrevia या कंपनीत गुंतवणूक केली आहे. ज्युबिलंट इंग्रेव्हिया ही ज्युबिलंट कंपनी लाईफ सायन्स या कंपनीच्या रि-स्ट्रक्चरिंगनंतर उदयास आलेली कंपनी आहे. या कंपनीत राकेश झुनझुनवाला आणि रेखा यांनी मार्च तिमाहीत खरेदी केली आहे. या कंपनीत आता झुनझुनवाला यांची 6.29 टक्के हिस्सेदारी आहे.
अशाच प्रकारे 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या तिमाहीत फंड मॅनेजर सुनील सिंघानिया यांच्या अबॅकस इमर्जिंग ऑपर्च्युनिटी फंड -1 ने इझी ट्रिप मध्ये 1.06 टक्के, 'न्यूरेका'मध्ये 2.38 टक्के, आणि सारडा एनर्जी अँड मिनरल्स यामध्ये 1.01 टक्के नवीन इक्विटी स्टेक्स विकत घेतले आहेत.
आशिष कचौलिया यांनीही याच कालावधीत फिलिप्स कार्बन ब्लॅक या कंपनीत आपली नवीन हिस्सेदारी खरेदी केली आहे. आशिष यांनी 1.45 टक्के नवीन हिस्सेदारी खरेदी केली आहे. यासचसोबत आशिष यांनी 'गरवारे हाय टेक फिल्म्स ' या कंपनीत देखील 2.03 टक्क्यांचा नवीन हिस्सा खरेदी केला आहे.
असं बोललं जातंय की, मागील एक वर्षात BSE च्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये अनुक्रमे 80 टक्के आणि 106 टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच सेन्सेक्समध्ये देखील 53 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
परताव्याच्या बाबतीत २०२१ मध्ये आतापर्यंत लघु आणि मध्यम समभागांनी दिग्गजांना मागे टाकल्याचं पाहायला मिळालं आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच BSE च्या मिडकॅप इंडेक्सवर तब्बल 23 टक्के तर स्मॉलकॅप इंडेक्सवर 32 टक्के बढत पाहायला मिळाली आहे. या तुलतेत सेन्सेक्स मात्र केवळ ९ टक्क्यांनीच वधारला आहे.
शेअर मार्केटमधील दिग्गज निवेशकांच्या मते, येत्या काळातही लघु आणि मध्यम समभागांवर नजर ठेवायला हवी. येत्या काळात बड्या समभागांपेक्षा लघु आणि मध्यम समभागच उत्तम परतावा देताना पाहायला मिळतील. त्यामुळे स्मॉल आणि मिडकॅप सेक्टरमधील गुणवत्तापूर्ण समभागांमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिग्गजांकडून आलेला पाहायला मिळतोय.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.