Share market: बिग बुल झुनझुनवालांचं एका आठवड्यात ७५३ कोटींचं नुकसान

टाटा समूहातील 'या' कंपनीच्या स्टॉकमुळे राकेश झुनझुनवालांना सहन करावं लागलं नुकसान.
Rakesh JhunJhunwala
Rakesh JhunJhunwala
Updated on

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार (Share market) तेजीत होता. पण सध्या घसरण सुरु आहे. शुक्रवारी शेअर बाजार कोसळला. त्यामध्ये गुंतवणूदकारांचे मोठं नुकसान झालं. बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पसंतीच्या टायटन कंपनीच्या (Titan company) शेअर्समध्ये ४.३७ टक्के घसरण झाली. या आठवड्याभरात टायटनच्या शेअरमध्ये ७ टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे.

टायटन कंपनीच्या शेअर्समधल्या घसरणीमुळे या आठवड्यात राकेश झुनझुनवाला यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये ७५३ कोटी रुपयांची घट झाली. टायटन कंपनीचा प्रतिशेअर २३७४ वरुन २२९३ रुपयापर्यंत खाली आला. एकाआठवड्यात टायटन कंपनीचा शेअर २४६७ वरुन २२९३ पर्यंत खाली घसरला.

Rakesh JhunJhunwala
कुर्ला: टेरेसवरच्या लिफ्टमध्ये मुलीचा मृतदेह, बलात्कार करुन हत्या

म्हणजे आठवड्याभरात १७४ रुपयांनी शेअर्सच मुल्य घटलं. हे नुकसान ७ टक्क्यांच्या घरात आहे. टायटन ही टाटा समूहातील कंपनी आहे. या कंपनीत राकेश आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचे बऱ्यापैकी शेअर्स आहेत.

Rakesh JhunJhunwala
Omicron: दक्षिण आफ्रिकेच्या विमान सेवेबद्दल BMC चं स्पष्टीकरण

जुलै ते सप्टेंबर २०२१ या तिमातही टायटन कंपनीतील शेअर्समधून त्यांनी उत्तम नफा कमावला आहे. त्यांच्याकडे टायटनचे ३ कोटी ३७ लाख ६० हजार ३९५ शेअर्स आहेत. त्यांच्याकडे असलेले शेअर्सचे हे प्रमाण ३.८० टक्के आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे ९५ लाख ४० हजार ५७५ टायटनचे शेअर्स आहेत. दोघांकडे मिळून टायटनचे ४ कोटी ३३ लाख ९७० शेअर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.