काल म्हणजेच ३ जून रोजी निफ्टीने नव्या उच्चांकाला गवसणी घातली. पहिल्यांदाच निफ्टीने 15 हजार 700 चा उच्चांक गाठला. काल गुरवार, अर्थात वायदा बाजाराची विकली क्लोजिंग असल्याने निफ्टी एका रेंजमध्ये ट्रेड करताना पाहायला मिळालं. मात्र बाजाराच्या दुसऱ्या सत्रात आणि दिवसाच्या शेवटी निफ्टीने चांगली उसळी घेत 15 हजार 700 या उच्चांकी स्तराला गवसणी घातली. अर्थात निफ्टीने15 हजार 700 चा उच्चांक गाठणे भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत सकारात्मक मानलं जातंय. जाणकारांच्या मते आजच्या दिवसात निफ्टी 17 हजार 800 नवा उच्चांक देखील गाठू शकते असं बोललं जात आहे. तर दुरीकडे सेन्सेक्स ने देखील 52 हजारांचा टप्पा ओलांडलेला आपल्याला पाहायला मिळाला . (RBI credit policy and stocks to watch for handsome returns)
मात्र आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज सकाळी 10 वाजता RBI ची क्रेडिट पॉलिसी घोषित केली जाणार आहे. गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्याकडून घोषित होणाऱ्या क्रेडिट पॉलिसीवर तुम्हाला आजच्या दिवसात फोकस ठेऊन शेअर बाजारात काम करावं लागेल. क्रेडिट पॉलिसी घोषित करताना RBI चे गव्हर्नर नक्की काय घोषणा करतात, याकडे शेअर बाजाराचं संपूर्ण लक्ष असणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसात बँक निफ्टी आणि बँकिंग समभागांकडे विशेष लक्ष ठेवलं पाहिजे.
कोणत्या शेअर्सवर ठेवाल नजर :
बँक निफ्टीवर RBI क्रेडिट पॉलिसीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. जर तुम्ही वायदा बाजारात ट्रेडिंग करत असाल तर बँक निफ्टीवर अधिक फोकस करा.
यासोबतच HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, SBI बँक या बँकिंगमधील मार्केट लीडर्सवर मानल्या जाणाऱ्या बँकिंग स्टोक्स वर लक्ष केंद्रित करा. या सोबतच NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांवर देखील नजर ठेवायला हवी. या सेक्टरमधील बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व हा दोन्ही काऊंटर्सवर नजर ठेवा.
याशिवाय कोणते शेअर्स रडारवर ठेवाल
ओएनजीसी - ONGC | वायदा बाजारात कच्च्या तेलाच्या किमती दोन वर्षांच्या उच्च स्तरावर आहेत. याचा सर्वाधिक फायदा तेल संशोधन कंपन्यांना होणार आहे. त्यामुळे ONGC वर खरेदी कारण्यास तज्ज्ञ सुचवत आहेत. 121 च्या स्टॉपलॉससह खरेदी करून आपल्याला 130 चं टार्गेट पाहायला मिळू शकतं.
टाटा केमिकल्स - Tata Chemicals । या कंपनीलाही आपल्या रडारवर ठेवायाला हवं. अनेक दिवसानंतर या कंपनीत चांगली खरेदी पाहायला मिळतेय. सध्या टाटा केमिकल्सचा शेअर 727 रुपयांवर असून या काउंटरवर आपल्याला 750 चं लक्ष्य जाणकार देतात.
अंबिका कॉटन मिल्स - Ambika cotton Mills | आजच्या सत्रात या शेअरवर देखील आपली नजर असायला हवी. मागील दोन ट्रेडिंग सत्रात हा समभाग चांगल्या तेजीत आहे. जाणकारांच्या मते सध्या 1292 च्या घरात ट्रेड करणारा हा शेअर येत्या काळात 1500 पर्यंत मजल मारू शकतो. यासाठी 1120 चा स्टॉपलॉस सुचवण्यात आला आहे.
टायटन - Titan | सोन्याच्या किमती पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतायत. अशात टायटन कंपनीला याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो. एकीकडे अनलॉक सुरु झालंय तर दुरीकडे वायदा बाजारात सोन्याचे भाव चढे पाहायला मिळतायत. त्यामुळे आजच्या सत्रात टायटनवर देखील नजर ठेवायला हवी
रुची सोया - Ruchi Soya | रुची सोया न्यूट्रिशन व्यापारात पाऊल टाकतेय. सोबतच या कंपनीने 'ऑर्डर मी' नावाचं स्वदेशी ऍप देखील बाजारात आणलंय. कंपनी येत्या काळात बाजारात त्यांचा IPO देखील आणणार आहेत. कालच्या सत्रात रुची सोयाचा शेअर 5 टक्क्यांनी वधारला होता. आजही या काउंटरवर नजर ठेवायला हवी.
नोंद : शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.