RBI चा ग्राहकांना इशारा; CVV, UPI पिनबाबत सावध राहा, अन्यथा..

RBI
RBIesakal
Updated on

आजच्या युगात डिजिटल व्यवहारांचा (Digital Transection) वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्राहक डिजिटल व्यवहाराशी संबंधित अनेक वेबसाइट आणि Apps वापरतात. त्यांच्या मदतीने त्यांचे पैशाचे व्यवहार सहज पूर्ण केले जातात. पण या सोबतच ऑनलाईन फसवणुकी (Online Fraud) च्या घटनाही खूप वाढत आहेत, त्यामुळे लोकांचा पैसा लुबाडला जात आहे.

या दरम्यान याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पुन्हा एकदा ग्राहकांना सतर्क केले आहे. फसवणूक टाळण्यासाठी मध्यवर्ती बँकेने ग्राहकांना नवनवीन फसवणूक प्रकारांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. आज आपण तुम्ही फसवणूक कशी टाळू शकता ते पाहूया.

RBI ने ट्विट करून केले अलर्ट

आरबीआयने ट्विट केले की, 'बँकिंग व्यवहारांसाठी सुरक्षित वेबसाइट आणि अॅप्सचा वापर करावा. तसेच, पब्लिक नेटवर्क वापरणे टाळले पाहिजेत. सुरक्षित व्यवहार तुमच्यापासून सुरू होतात.

RBI
वाहनात CNG किट बसवण्यासाठी नवे नियम, 'या' गाड्यांना मिळणार परवानगी

फसवणूक कशी होते?

वास्तविक, या सायबर फसवणुकीमुळे कोणत्याही बँकेच्या अधिकृत क्रमांकातील एक किंवा दोन अंक बदलले जातात. मग ते हे क्रमांक कोणत्याही एप्लिकेशन, बँक किंवा वित्तीय कंपनीच्या नावावर नोंदवले जातात. तसेच, लोकांना कॉल करून किंवा मेसेज करून, त्यांचा CVV, OTP किंवा PIN मागून त्यांची फसवणूक केली जाते. देशभरात अनेक ठिकाणी असे प्रकार सर्रास केले जातात. त्यामुळे आपण काळजी घेणे गरजेचे आहे.

RBI
Jio vs Vi : दररोज 3GB डेटा देणारा कोणाचा प्लॅन आहे बेस्ट?

फसवणूक कशी टाळावी?

तुम्ही कोणत्याही बँक किंवा वित्तीय कंपनीला कॉल करणार असाल, तर तुमच्याकडे त्यांच्या ट्रोल फ्री नंबरची योग्यती संपूर्ण माहिती असली पाहिजे. त्याच वेळी, कोणत्याही बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर तुमची सर्व माहिती कधीही शेअर करू नका. तसेच, तुमचा OTP, PIN आणि CVV कोणाशीही शेअर करू नका.

RBI
बिटकॉईन, इथेरियम, NFT कायदेशीर होणार? अर्थ सचिवांनी केलं स्पष्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.