UTI म्युच्युअल फंडची नवी स्कीम, एसआयपीचीही सुविधा

NFO मध्ये मोठ्या, मिडकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल
Mutual Funds
Mutual FundsSakal
Updated on

तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगली स्कीम शोधत असाल, तर ही बातमी नक्की वाचा. कारण म्युच्युअल फंड कंपनी UTI म्युच्युअल फंडने नवीन स्कीम युटीआय एस अँड पी बीएसई लो व्होलेटिलिटी इंडेक्स फंड (UTI S&P BSE Low Volatility Index Fund) लाँच केली आहे. या ऑफरचे (NFO) सब्‍सक्रिप्‍शन 14 फेब्रुवारी 2022 पासून खुले झाले आहे. यामध्ये 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत पैसे गुंतवले जाऊ शकतात. हा एक ओपन एंड फंड आहे. म्हणजेच गुंतवणूकदार त्यांना पाहिजे तेव्हा या योजनेतून बाहेर पडू शकतात. त्याचा बेंचमार्क निर्देशांक S&P BSE Low Volatility Index TRI आहे. योजनेची सब्सक्रिप्शन आणि रिडम्‍प्‍शन 7 मार्च 2022 रोजी पुन्हा खुले केले जाईल.

Mutual Funds
SBI MF कडून मल्टी-कॅप योजना लाँच... गुंतवणूक करावी का ?

कोणी गुंतवणूक करावी ?

NFO मध्ये मोठ्या, मिडकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल. हे S&P BSE लार्ज-मिडकॅपमध्ये समाविष्ट असलेल्या 30 कंपन्यांच्या कामगिरीचा मागोवा घेते, ज्या कमीत कमी अस्थिर आहेत. कमी अस्थिरता असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. याशिवाय या फंडातील गुंतवणूकदारांना इंडेक्‍स रिटर्नसह कॅपिटल ग्रोथचा लाभही मिळेल. याचे फंड मॅनेजर युटीआय एएमसीचे प्रमुख (पॅसिव्ह, आर्बिट्रेज आणि क्वांट स्ट्रॅटेजीज) श्रवण कुमार गोयल आहेत.

Mutual Funds
शेअर बाजारात आज कशी असेल स्थिती ? हे ठरू शकतात टॉप 10 शेअर्स

किमान गुंतवणूक

UTI S&P BSE लो व्होलॅटिलिटी इंडेक्स फंडात किमान 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीसह कोणीही गुंतवणूक करू शकतो. यावर आणखी एका रुपयाच्या पटीत गुंतवणूक करू शकता. यानंतर, एका फोलिओ अंतर्गत, तुम्ही किमान 1,000 रुपये आणि त्याहून अधिक 1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक करू शकता. या योजनेंतर्गत एंट्री लोड आणि एक्झिट लोड नाही. या योजनेत गुंतवणूकदारांना एसआयपी आणि मायक्रो एसआयपीचीही सुविधा आहे. याशिवाय, सिस्‍टमॅटिक विथड्रॉवल प्‍लॅनही (SWP) उपलब्ध आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.