रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने (आरएनईएसएल) सौर ऊर्जा क्षेत्रात भरारी घेत आणखी एका कंपनीत गुंतवणूक केली आहे.
रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड आता स्टर्लिंग आणि विल्सन सोलरमध्ये 40 टक्के भागभांडवल खरेदी करणार आहे. या कंपनीच्या अधिग्रहणासह स्टर्लिंग अँड विल्सन सोलर कंपनीत 40% भागभांडवल घेऊन 9,300 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा व्यवहार करणार आहेत. या दोन्ही कंपन्या शापूरजी-पलोनजी समूहाच्या मालकीच्या आहेत. रिलायन्सने याआधीच नोर्वेजिअन REC सोलार कंपनीचे अधिग्रहण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने चीन नॅशनल ब्लूस्टर (ग्रुप) कंपनी लिमिटेडकडून आरईसी होल्डिंग्ज कंपनी 771 दशलक्ष डॉलर्सला टेकओव्हर करत असल्याची घोषणा केली. सन 2035 पर्यंत झीरो कार्बन इमिशनचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.
यानंतर आता सौरऊर्जा क्षेत्रात आणखी एक मोठी गुंतवणूक पाहायला मिळणार आहे. हा करार RNESL, शापूरजी पालोनजी अँड कंपनी, खुर्शीद दारुवाला आणि SWSL यांच्यात आहे. हा करार रिलायन्स समूहासाठी 2030 पर्यंत 100 GW सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याचप्रमाणे जागतिक बाजारातील सौर ऊर्जा उद्योगात रिलायन्स मोठा खेळाडू बनण्यास सक्षम असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.