सातारा : क्रेडिट कार्ड म्हणजे काय? हा अत्यंत मूलभूत प्रश्न आहे. ही संकल्पना आता काही नवीन राहिलेली नाही. पण, क्रेडिट कार्डचे कामकाज कसे चालते, त्याचे फायदे-तोटे काय आहेत, याबद्दल मात्र फार कमी लोकांना माहिती आहे. आजच्या लेखात ही माहिती सोप्या शब्दांत समजून घेऊया. वाढत्या खर्चातही क्रेडिट कार्ड हा उत्तम पर्याय आहे, ज्यानं आपल्याला उधारीवर काहीही घेता येते. त्याऐवजी रोखीच्या कमतरतेमध्ये मोकळेपणाने खर्च करण्याची संधी देखील मिळते. परंतु, जेव्हा आपल्याला मोठ्या रकमेची आवश्यकता असते, तेव्हा कर्ज हा एक उत्तम पर्याय असतो. काही लोक कोणते कर्ज घ्यावे याबद्दल संभ्रमात आहेत. म्हणून, क्रेडिट कार्डावर कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जणे करुन आपल्याला कर्ज घेतल्यास कोणतेही नुकसान सहन करावे लागणार नाही.
क्रेडिट कार्ड वापरण्याचे 8 महत्वाचे फायदे
तुम्ही देखील क्रेडिट कार्डचा वापर करताय? जर हो, तर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर जास्तीत-जास्त केला पाहिजे. पण, त्याच बरोबर क्रेडिट कार्डचा वापर करताना काळजी घेणे देखील गरजेचे आहे. जर क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला, तर तुम्ही कर्जाच्या जाळ्यात देखील अडकू शकता. या कर्जाच्या ओझ्याखाली दबले जाऊ नये याच कारणामुळे अनेक जण डेबिट कार्ड वापरणे पसंत करताहेत. मात्र, आज अनेकजण क्रेडिट कार्डच वापरतात. परंतु, हे वापरताना असताना याचा कार्डाचा आपल्याला कितपत लाभ होतो हे देखील पाहणे महत्वाचे आहे, त्यामुळे जेव्हा कधी आपण कर्ज काढणार आहात, तेव्हा या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
क्रेडिट लिमिट : क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, क्रेडिट कार्डद्वारे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत उचल घेता येते. थोडक्यात, खात्यामध्ये अथवा तुमच्या जवळ पैसे नसले तरीही, क्रेडिट कार्डचा वापर करून बँकेने निश्चित केलेल्या रक्कमेपर्यंत तुम्हाला व्यवहार करता येतो. या निश्चित मर्यादेला 'क्रेडिट लिमिट' असे म्हणतात.
परतफेडीसाठी कालावधी : क्रेडिट कार्डद्वारे करण्यात आलेल्या व्यवहारची परतफेड करताना ग्राहकाला एक निश्चित कालावधी देण्यात आलेला असतो. हा कालावधी साधारणत: २० ते ५० दिवसांचा असतो. या कालावधीमध्ये तुम्ही कधीही पेमेंट परत करू शकता. यावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही.
हफ्त्यांद्वारे वस्तू खरेदी करणे सोपे : जर तुम्ही एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि आर्थिक कारणांमुळे ती वस्तू घेणे शक्य नसेल, तर अशा वेळेस क्रेडिट कार्ड हे फायदेशीर ठरते. क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही वस्तू खरेदी करू शकता व त्याचे मासिक हफ्ते देखील क्रेडिट कार्डद्वारे देणे सोपे पडते.
व्यवहारांच्या नोंदीसाठी फायदेशीर : आपण अनेक ठिकाणी व्यवहार करत असतो. खरेदी करत असतो. पण, त्या व्यवहारांची नोंद करून ठेवणे काही वेळेस विसरून जातो व महिन्याच्या अखेरीस कोणते पैसे कोठे खर्च झाले याची नोंद शोधू लागतो. अशा वेळेस क्रेडिट कार्डने केलेले व्यवहार फायदेशीर ठरतात. क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या व्यवहारांचे स्टेटमेंट वापरकर्त्यांना प्रत्येक महिन्याला मिळत असते. त्यामध्ये तुम्ही कोठे कोठे, किती खर्च केला याची संपूर्ण नोंद असते.
प्रोत्साहनपर ऑफर्स : अनेक वेळा क्रेडिट कार्ड्सवर अनेक ऑफर्स देण्यात येतात व खरेदीसाठी प्रोत्साहित केले जाते. अनेक निरनिराळ्या ऑफर्समुळे बचत देखील होत असते. तसेच कार्डवर रिवार्ड पॉइंट्स देखील मिळतात. ते पॉइंट्स रिडिम देखील करता येतात. नवीन वर्ष, दिवाळी अशा सणांच्या काळात खरेदी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध ऑफर्स दिल्या जातात.
अडचणीच्या काळात मदतगार : जर अडचणीच्या काळात तुम्हाला रोख रक्कम हवी असेल, तर अशावेळेस क्रेडिट कार्डचा वापर करून देखील एटीएममधून रोख रक्कम काढता येते. मात्र, यावर अधिक प्रमाणात व्याज आकारले जाते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करून एटीएममधून पैसे काढणे टाळावे.
विमा सुरक्षा : अनेक वेळा क्रेडिट कार्डद्वारे विमा सुरक्षा देखील प्रदान केली जात असल्याची माहिती वापरकर्त्याला देखील नसते. सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम व प्रीमियम अशा कार्डच्या श्रेणी असतात. त्यानुसार वापरकर्त्याला विमा सुरक्षा कवच देण्यात येत असते.
सुरक्षित : डेबिट कार्डच्या तुलनेत क्रेडिट कार्डचा वापर सुरक्षित आहे. डेबिट कार्ड काही प्रमाणात असुरक्षित आहे, कारण याचा वापर करून कोणीही एकाच वेळेस तुमच्या खात्यातील संपूर्ण रक्कम काढू शकतो व ही रक्कम परत येण्यास देखील वेळ लागतो. क्रेडिट कार्डच्या बाबतीत ही चूक सुधारण्याची संधी असते.
क्रेडिट कार्डावर कर्ज घेताय?, मग याही गोष्टी लक्षात ठेवा..
प्रक्रिया शुल्क माहीत असणे आवश्यक : क्रेडिट कार्ड कर्ज घेताना कृपया प्रक्रिया फी जाणून घ्या. प्रक्रिया शुल्क सामान्यत: 1-5 टक्क्यांपर्यंत असते. परंतु, आपण किती काळ कर्ज घेत आहात यावर सर्व अवलंबून आहे. तसेच क्रेडिट कार्डची वैधता किती काळ आहे? सामान्यत: कर्ज फक्त 24 महिन्यांसाठी म्हणजेच दोन वर्षांसाठी दिले जाते. तसेच प्री-क्लोजरची सुविधा देखील आहे.
वेळेवर बिल भरण्यास विसरू नका : क्रेडिट कार्ड कर्जे पूर्व मंजूर असतात. परंतु, कंपनी किंवा बँक आपले रेकॉर्ड कसे आहे, याची तपासणी करते. क्रेडिट कार्डवर कर्ज मिळविण्यासाठी आपली परतफेडची पत चांगली असणे आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरल्यावर रेकॉर्ड राखला जातो आणि कर्जाला सहज मान्यता दिली जाते.
कर्जाची वेळेवर परतफेड करत रहा : आपण क्रेडिट कार्ड कर्ज घेतले असल्यास, आपण घेतलेल्या कालावधीच्या आत कर्जाची परतफेड करा. असे केल्याने कोणत्याही वेळी कर्ज घेण्याची संधी खुली होईल. तसेच टॉप-अप कर्ज मिळण्याची शक्यताही पूर्ण होईल.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा 'लाभ'
पैसे वाटपाच्या पध्दती सोप्या करते.
नगद आणि स्वरूपासंबंधी कठीणपणा काढून टाकते.
प्रत्येक पिकासाठी कर्जाकरिता अर्ज करण्याची गरज नाही.
शेतकऱ्यांसाठी व्याजाचा भार कमी करणे शक्य करीत कोणत्या ही वेळी खात्रीलायकपणे कर्ज मिळण्याची हमी.
शेतकऱ्याच्या सवडी आणि निवडीप्रमाणे बियाणे खरेदीस मदत करते.
डीलर्सकडून कॅश अव्हेल डिस्काउंट (नगद लाभ सूट) वर खरेदी करण्यास मदत.
वर्षांपर्यंत कर्जाची सुविधा-हंगामी मूल्यांकनाची गरज नाही.
किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवावे
आपल्या नजीकच्या पब्लिक सेक्टर बँकेस भेट द्या आणि तपशील मिळवा.
पात्र असलेल्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि एक पासबुक मिळेल. त्यामध्ये नांव, पत्ता, जमिनीच्या मालकीचे (स्वामित्वाचे) विवरण, कर्ज घेण्याची सीमा, कायदेशीर मान्यता काळ, धारकाचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो ज्याचा उपयोग ओळख पत्र आणि नेहमीच्या व्यवहाराची नोंद करण्याची सोय, असे दोन्ही हेतू साध्य करण्यासाठी करण्यात येईल.
हे पासबुकवजा कार्ड धारकाने दाखवावे जेव्हा ती/तो खात्याचे संचालन करील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.