Credit Card Tips: क्रडिट कार्ड वापरणे आताची क्रेझ झाली आहे. हौस पुर्ण करण्यासाठी तात्काळ आपल्याकडे पैसे उपलब्ध नसतील तर क्रेडिट कार्डचा उपयोग करुन आपण हवी ती वस्तू त्याचक्षणी खरेदी करु शकतो. रोख रक्कम आपल्याकडे उपलब्ध असो कि नसो क्रेडिट कार्डमुळे आपले काम पुर्ण होते. यासह अनेक लोक आता रोख रकमेपेक्षा क्रेडिट कार्डचा वापर करण्याला पसंती देतात. पण तुम्हाला माहितीये का..? क्रेडिट कार्डचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. असे न केल्यास तुम्हाला मोठा भुर्दंड तर बसेलच पण विनाकारण मनस्तापही सहन करावा लागू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना कोणती काळजी घ्यावी ते आपण जाणून घेऊया.
क्रेडिट कार्ड तुम्हाला देताना अनेकदा बँकांकडून अनेक अटीशर्तींच्या आड अनेक आश्वासने दिली जातात. आपल्याला क्रडिट कार्ड मिळते आहे या उत्साह अन् आनंदाच्या भरात या अटी- शर्तींकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
अत्यंत गरज असल्याशिवाय क्रेडिट कार्डचा वापर करु नये. वस्तु घ्यायच्या असतील तर प्लॅनिंग करुन घ्याव्या. आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहे म्हणून वस्तू घेऊन ठेवायच्या अन् होणाऱ्या कमाईपेक्षा क्रेडिट कार्डच बिल जास्त आल्यास ते डोईजड होऊन बसेल. तरीही क्रेडिट कार्ड वापरलचं तर पुढची सेटलमेंट मुदतीच्या आत न विसरता करण्यासाठी नियोजन करा.
सध्या ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार मोठ्याप्रमाणावर वाढले आहेत. अनेकदा बँकेचा प्रतिनीधी म्हणून आपल्याला क्रेडिट कार्डविषयी माहिती विचारली जाऊ शकते. आपल्या कार्ड संबंधीचा तपशील जसे कि, क्रेडिट कार्डवर असलेले नाव अन् नंबर, CVV, CVC, OTP, Expiry Date कोणालाही सांगू नका.
अनेक क्रेडिट कार्ड EMI (मासिक हप्ते) योजनांसह देखील येतात, त्यामुळे तुम्ही त्यांना EMI मध्ये रूपांतरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू शकता. परंतु या सुविधेचा लाभ घेण्यापूर्वी, तुम्हाला संबंधित शुल्काबाबत, पुर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
हे देखील लक्षात ठेवा की तुमची क्रेडिट मर्यादा EMI वर खरेदी केलेल्या उत्पादनाच्या एकूण रकमेपर्यंत ब्लॉक केली जाईल आणि तुम्ही हप्ते भरताच ती पुन्हा उघडेल. EMIच्या परतफेडीमध्ये कोणताही हलगर्जीपणा झाल्यास अतिरिक्त व्याज आकारला जाईल, ज्यामुळे तुमची क्रेडिट कार्ड शिल्लक वाढेल. आणि यामुळे तुमच्या खिशाला खार लागेल.
क्रेडिट कार्ड वापरताना नेहमी वेळेवर बिल भरण्याची तयारी ठेवा. शेवटच्या तारखेपूर्वी नेहमीच बिल भरण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपला सिविल स्कोअर मजबूत होईल. यामुळे दुसऱ्या बँकेकडून कर्ज मिळही सोप होईल. वेळेवर पैसे भरले नाहीत तर दंड भरावा लागेल आणि तुमचा सिविल स्कोअरही खाली येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.