Rolex Rings IPO: उद्या होणार रोलेक्स रिंग्जचा आयपीओ लाँच

रोलेक्स रिंग्जचा आयपीओ 56 कोटी रुपयांचे नवे शेअर्स इश्यू करेल
IPO
IPOIPO
Updated on

औरंगाबाद: Rolex Rings IPO:वाहनांचे सुटे भाग बनवणारी कंपनी रोलेक्स रिंग्जचा आयपीओ (Rolex Rings IPO) उद्या, 28 जुलै रोजी खरेदीसाठी खुला होणार आहे. सोमवारी कंपनीने यासाठी निश्चित केलेल्या प्राइस बँडबद्दल माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 731 कोटींच्या आयपीओ म्हणजे इनीशियल पब्लिक ऑफरसाठी (Initial public offering) कंपनीने 880-900 रुपये किंमतीची बँड निश्चित केली आहे. हा आयपीओ वर्गणीसाठी किंवा खरेदीसाठी तीन दिवस म्हणजेच 30 जुलैपर्यंत खुला असणार आहे. अँकर गुंतवणूकदारांच्या बोलीसाठी कंपनीचा आयपीओ आज 27 जुलै रोजी खुला होईल. कंपनीच्या आयपीओच्या यशानंतर त्याचे इक्विटी शेअर्स बीएसई (BSE) आणि एनएसईवर (NSE) सूचीबद्ध होतील.

56 कोटींचे नवे शेअर होतील इश्यू-

रोलेक्स रिंग्जचा आयपीओ 56 कोटी रुपयांचे नवे शेअर्स इश्यू करेल. तर 675 कोटींचे शेअर्स रिव्हेंडेल पीई एलएलसी (आधी- NSR-पीई मॉरिशस एलएलसी) ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत जारी केले जातील. नव्या शेअर्सद्वारे जमा केलेला निधी कंपनी त्यांच्या पुढील कामकाजाच्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वापरेल आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी देखील हा पैसा वापरला जाईल. इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स ऍंड सिक्युरिटीज लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे या आयपीओचे बुक लीड मॅनेजर आहेत.

IPO
संधी भाकरी फिरविण्याची!

नफा वाढला पण महसूलात घट-

गुजरातच्या राजकोटमध्ये स्थित रोलेक्स रिंग्ज ही देशातील वाहन घटकांची निर्मित्ती करणारी आघाडीवरील कंपनी आहे. मागील आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये कंपनीचा नफा 86.95 कोटी रुपये होता, तर त्याच्या पुर्वीच्या आर्थिक वर्षात 2019-20 मध्ये कंपनीचा नफा 52.94 कोटी रुपये होता. कंपनीचा नफा जरी वाढला असला तरी महसूल घसरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.