रोल्स रॉइसची कर्मचारी कपात; किती ते वाचा सविस्तर

rolls-royce
rolls-royce
Updated on

नवी दिल्ली - कोरोनामुळे जगभरात ठप्प झालेल्या व्यवहारांची झळ आता मोठ्या कंपन्यांना बसू लागली आहे. विमानांचे इंजिन तयार करणाऱ्या ब्रिटनमधील रोल्स रॉइस या कंपनीने नऊ हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. नऊ हजार कर्मचारी  कमी केल्यामुळे ७० कोटी पाउंडची बचत होणार आहे.

लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे कारण सांगत कंपनीने कर्मचारी कपात केली आहे. युरोपामधील देशांना आता मंदीची झळ बसू लागली आहे. युरोपातील आतापर्यंतची मोठी नोकरकपात मानली जात आहे. 

कोरोनाचा सर्वाधिक फटका विमान कंपन्यांना बसला आहे. जगभरातील विमान वाहतूक बंद असल्याने आधीपासूनच संकटात असलेल्या जगभरातील विमान कंपन्या आता दिवाळखोरीच्या वाटेवर आहेत. विमान वाहतूक बंद असल्याने विमानांचे इंजिन आणि इतर सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या अडचणीचा सामना करत आहेत. 

रोल्स रॉइस ही ''बोइंग-७८७'' आणि ''एअरबस-३५०'' विमानांचे इंजिन तयार करते. मात्र मागणी घटल्याने कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात जाहीर केली आहे. 

रोल्स रॉइसचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन इस्ट म्हणाले, ''कंपनी प्रकल्पाची क्षमता कमी करण्याच्या विचारात आहे. विमान सेवा बंद असल्याने हवाई सेवा क्षेत्राशी निगडित सर्वच उद्योगांना मोठा फटका बसला आहे. यामुळे कंपनीने खर्च कमी करण्यासाठी नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे.''

''रोल्स रॉइस''चे जगभरात ५२ हजार कर्मचारी आहेत. कंपनीचे जर्मनी , सिंगापूरसह इतर काही देशात प्रकल्प आहेत.  कंपनीची वार्षिक उलाढाल १५ अब्ज पाउंड आहे. कंपनीचा दरवर्षी किमान १.३ अब्ज पौंडची बचत करण्याचा मानस आहे. आहे. 

वर्ष १९८७ मध्ये कंपनीचे खासगीकरण झाल्यानंतर ही दुर्दैवाने मोठी नोकर कपात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()