व्यवसाय (बिझनेस) म्हणजे फक्त नफा हे वरकरणी दिसणारे सूत्र खूप लोभस असले तरी कोणत्याही व्यवसायाची सुरवात आणि त्याचा विस्तार करताना उद्योजकाला अनेक बाबींचा विचार आणि आर्थिक तजवीज करावी लागते. एकीकडे भांडवल उभारणी जिकिरीची ठरत असताना, अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक नुकसानालादेखील सामोरे जावे लागते. अशावेळी विविध प्रकारचे विमा पर्याय व्यवसायासाठी महत्त्वाचे ठरतात. (Roshan Thapa Writes about Business Needs Insurance Cover)
दुकानांचा किंवा ऑफिस विमा
मोबाईल, इलेक्ट्रिक उपकरणांची विक्री करणारी छोटी दुकाने, प्लास्टिक वा कपड्यांची दुकाने किंवा किराणा मालाच्या छोट्या दुकानांत किंवा ऑफिस आणि गोदामांमध्ये लाखो रुपयांचा माल असतो. त्याचबरोबर ऑफिसमध्ये कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, फर्निचर यांसारख्या महागड्या वस्तू असतात. मात्र, विजेचे शॉर्टसर्किट होऊन लागणारी आग, मुसळधार पावसात इमारत खचल्याने किंवा झाडे मोडून पडल्याने होणारे नुकसान, भूकंप किंवा हिंसाचार, दंगल, जाळपोळ, चोरी यांसारख्या घटना घडल्यास क्षणार्धात लाखो रुपयांचे नुकसान होते. या नुकसानीपासून संरक्षण मिळावे म्हणून विमा अतिशय महत्त्वाचा असतो. दुकानाची जागा आणि मालाची किंमत यानुसार किमान दोन ते तीन हजार रुपयांच्या वार्षिक प्रीमियममध्ये लाखो रुपयांच्या नुकसानीला कवच मिळविता येते.
ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी महत्त्वाची
कोणताही व्यवसाय करताना सक्षम आणि चिंतामुक्त मनुष्यबळ हे कंपनीची उत्पादकता वाढविण्यासाठी महत्त्वाचे असते. अपघात किंवा आजारपणामुळे येणारा दवाखान्याचा खर्च भागविताना मालकापासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचीच मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या दमछाक होते. त्यामुळे, वाढत्या वैद्यकीय खर्चापासून कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून ‘ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी’ अतिशय महत्त्वाची आहे. किमान सात कर्मचारी असलेली कोणतीही संस्था वा कंपनी अशी पॉलिसी घेऊ शकते. कामावर असताना होणारे अपघात किंवा इतर महागडे वैद्यकीय उपचार करणे या पॉलिसीमुळे सहजशक्य असल्याने कंपनी आणि कर्मचारी या दोघांचा फायदा होतो. अतिशय कमी प्रीमियम आणि पॉलिसी घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून मॅटर्निटी खर्च किंवा इतर कोणत्याही आजारांना मर्यादा नसल्याने ही पॉलिसी फायदेशीर ठरते. या अंतर्गत दोन ते तीन हजार रुपयांच्या प्रीमियम रकमेमध्ये कर्मचाऱ्यांना संपूर्ण कुटुंबासाठी विमा कवच मिळते. अर्थातच, कुटुंबाची सदस्य संख्या जास्त असेल तर प्रीमियमच्या रकमेत वाढ होते.
डायरेक्टर अँड ऑफिसर्स लायबिलिटी पॉलिसी
कंपनीच्या संचालक मंडळावर किंवा महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान झाल्यास किंवा ग्राहक अथवा थर्ड पार्टीमार्फत एखाद्या चुकीसाठी खटला दाखल केल्यास या पॉलिसीमार्फत संरक्षण मिळू शकते. याशिवाय, व्यवस्थापक, अधिकारी आणि संचालक पदांवरील महत्त्वाच्या व्यक्तीने कंपनीच्या फंडातून पैशांची अफरातफर केल्यास, इतर आर्थिक गैरव्यवहार किंवा बेकायदा बाबींमध्ये अडकल्यामुळे; तसेच सेक्श्युअल हरॅसमेंट (लैंगिक अत्याचार)सारख्या प्रकरणांमध्ये अडकल्यास कंपनीला होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळविण्यात ही पॉलिसी महत्त्वाची ठरते.
एमडी/सीएफओ/सीईओंसाठी खास विमा
कंपनीची ध्येयधोरणे आखताना, आर्थिक नियोजन करताना एमडी, सीएफओ किंवा सीईओ यांसारख्या व्यक्तींचा मोठा वाटा असतो. या महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींच्या सल्ल्यानुसार कंपनीने लाखो, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेली असते. अशावेळी जर एखाद्या व्यक्तीचे अकस्मात निधन झाले, तर कुटुंबीयांबरोबरच कंपनीसाठीदेखील तो मोठा धक्का असतो. अशावेळी आयुर्विमा पॉलिसीअंतर्गत येणारी ‘की-मॅन’ पॉलिसी महत्त्वाची ठरते. यामुळे कर्मचाऱ्याच्या निधनानंतर विम्याच्या माध्यमातून कंपनीला आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळते.
तुम्हीदेखील तुमच्या व्यवसायासाठी विमा संरक्षण घेऊ इच्छिताय?
नैसर्गिक आपत्तींबरोबरच व्यवसायातील इतर जोखीम अभ्यासून योग्य विमा घेण्यासाठी ७३५०८ ७३५०८ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. आमचे तज्ज्ञ विमा सल्लगार तुम्हाला संपर्क साधून विमा पॉलिसी घेण्यासाठी मदत करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.