स्मार्ट खबरदारी : हॉस्पिटल स्टाफला स्वस्तात विमा संरक्षण!

वैद्यकीय सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या तळागाळातील कर्मचाऱ्यांपासून तज्ज्ञ डॉक्टरपर्यंत सर्वच जण आपले प्राण पणास लावून ‘कोविड’च्या महासाथीचा सामना करीत आहेत.
Sakal Money
Sakal MoneySakal
Updated on

वैद्यकीय सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या तळागाळातील कर्मचाऱ्यांपासून तज्ज्ञ डॉक्टरपर्यंत सर्वच जण आपले प्राण पणास लावून ‘कोविड’च्या महासाथीचा सामना करीत आहेत. परिणामी, जीवघेण्या आजारापासून लाखो नागरिकांचे प्राण वाचवताना या क्षेत्रात कार्यरत डॉक्टर, परिचारिका किंवा इतर हॉस्पिटल स्टाफला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली आहे. अनेकजण ‘कोविड’बाधित होऊन वैद्यकीय खर्च भागविताना कर्जबाजारी देखील झाले आहेत. ‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर, वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप मेडिकल पॉलिसी (जीएमसी) घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने ‘कोविड’चा सर्वांत जास्त धोका ज्या क्षेत्राला संभवतो, त्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत मेडिकल स्टाफ, पॅथॉलॉजी लॅब, डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही ग्रुप मेडिकल पॉलिसी दिली जात नाही. त्याला विमा कंपन्यांकडून अनेक तांत्रिक कारणे दिली जातात.

असे असले तरी जिवाची बाजी लावून काम करणाऱ्या या ‘कोविड योद्धयांना’ देखील विमा कवच मिळालेच पाहिजे, ही ‘सकाळ मनी’ची भूमिका आहे. म्हणूनच १०,५०२ रुपयांच्या ‘फिक्स्ड प्रीमियम’मध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांना वय वर्षे ५५ पर्यंत कोणत्याही मेडिकल टेस्टविना ‘ओपीडी’सह इतर सर्व सुविधा देणारी तीन लाख रुपयांची विमा पॉलिसी मिळावी म्हणून ‘सकाळ मनी’ आता कोविड योद्धे आणि विमा कंपनी यांना जोडणाऱ्या दुव्याचे काम करीत आहे. तसेच कोविड योद्धयांना क्लेम आणि इतर सेवा पुरविण्यासाठी ‘सकाळ मनी’ची खास टीम कार्यरत असेल.

विमा संरक्षण घ्यायचेय?

तुम्हीदेखील वैद्यकीय सेवा क्षेत्रात कार्यरत असाल किंवा व्यवस्थापन म्हणून आपल्या कर्मचारी आणि डॉक्टरांना विम्याचे संरक्षण देऊ इच्छित असाल, तर ७४४७४ ५०१२३ या क्रमांकावर मिस्ड कॉल नोंदवा. ‘सकाळ मनी’चे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधून योग्य विमा संरक्षण देण्याचा प्रयत्न करतील.

(लेखक ‘सकाळ मनी’चे बिझनेस हेड आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.