पॅकेजिंग सोल्यूशन्स सेवा देणाऱ्या साह पॉलिमर्सच्या (Sah Polymers) आयपीओला शुक्रवारी 30 डिसेंबरल पहिल्या दिवशी सुमारे 86 टक्के सबस्क्रिप्शन मिळाले. कंपनीने त्यांच्या आयपीओअंतर्गत एकूण 56.1 लाख शेअर्स विक्रीसाठी ठेवले आहेत, त्यापैकी पहिल्या दिवशी 48.04 लाख शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली आहे.
2022 चा शेवटचा आयपीओ आहे. या आयपीओअंतर्गत 1.02 कोटी नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. साह पॉलिमर्सचा आयपीओ 30 डिसेंबर ते 4 जानेवारी 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल.
इश्यूच्या 75 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB), 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) आणि 10 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील.
साह पॉलिमर्सचा 66 कोटींच्या आयपीओअंतर्गत फक्त नवीन शेअर्स जारी केले जातील. इश्यूसाठी 61-65 रुपयांचा प्राइस बँड आणि 230 शेअर्सचा लॉट आकार निश्चित केला आहे, याचा अर्थ किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 14,950 रुपये गुंतवावे लागतील.
शेअर्सचे वाटप 9 जानेवारीला अंतिम असेल आणि बीएसई-एनएसईवर ते 12 जानेवारीला लिस्टिंग होईल.
इश्यूचे रजिस्ट्रार लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहेत. याद्वारे उभारलेला निधी कंपनीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी, कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल
साह पॉलिमर्स पॉलीप्रॉपिलीन/हाय-डेंसिटी पॉलीथिलीन एफआयबीसी बॅग्स, विणलेल्या सॅक, पॉलीप्रॉपिलीन/हाय-डेंसिटी पॉलीथिलीन विणलेले कापड आणि पॉलिमर तयार करते.ऍग्रो पेस्टिसाइड्सही, फार्मास्युटिकल, सिमेंट, केमिकल, खते, खाद्य उत्पादने, फॅब्रिक्स, टाइल्स आणि स्टील उद्योगातील कंपन्यांना बॅगमध्ये पुरवठा करते.
त्यांचा व्यवसाय आफ्रिका, मध्य पूर्व, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅरिबियनमध्ये पसरलेला आहे ज्यात देशातील 6 राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2020 मध्ये फक्त 30 लाख रुपयांचा नफा कमावला, त्यानंतर पुढील आर्थिक वर्ष 2021 मध्ये तो 1.27 कोटी रुपयांपर्यंत वाढला आणि त्यानंतर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 4.38 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.