तुमचा पगार आहे अनियमित पण बचत करायचीय? असे करा नियोजन

money
moneyesakal
Updated on

ज्या व्यक्तींना नियमित मानधन खात्यात येत असल्याने अनेकजण सेव्हिंगच्या बाबतीत बेफिकीर असतात. पण ज्या व्यक्ती कुठल्याही कंपनी किंवा संस्थेत नोकरी करत नाहीत. कामानुसार पैसा कमावतात, किंवा पगार कमी मिळत असेल किंवा ज्यांची मिळकत ही अनियमत असेल अशा व्यक्तींना कधी ना कधी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. पण योग्य नियोजन केले की अनियमत व कमी मिळकतीमध्येही पैशांची बचत करता येते. ती कशी ते बघूया. (salary-is-irregular-but-want-to-save-money-marathi-news)

स्वत:ला शिस्त लावा

आधीच पैसे कमी मिळतात. त्यात दिवसेंदिवस वाढणारी महागाई यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्यांपुढे बचत कशी करायची असा प्रश्न असतोच. पण हजार रुपयातले कमीत कमी 100 रुपये तरी बचतीसाठी बाजूला ठेवता येतील असा विचार करूनच खर्चाचा ताळमेळ घालावा. त्यामुळे पैसे तर वाचतीलच शिवाय कमी मिळकतीत काटकसर कशी करायची, पैशांची बचत कशी करायची हे देखील कळते.

प्रोव्हीडंड फंडचा लाभ नाही...तर...

जर तुम्हांला कंपनीकडून ईपीएफ प्रोव्हीडंड फंडशी संबंधित लाभ मिळत नसेल तर रिटायरटनंतरचा काळासाठी तुम्हाला स्वतच बचत करावी लागणार हे समजून जा. त्यातच रिटायरमेंटनंतरच्या जीवनासाठी पैसे कसे जमा करायचे याचा सल्लाही तुम्ही तज्त्रांकडून घेऊ शकता.

उत्पन्नाचे दुसरे स्त्रोतही हवेच

सध्याच्या काळात एका व्यक्तीच्या पगारात घर चालवणे खरंच कठिण झाले आहे. यामुळे उत्पन्नाचे दुसरे स्त्रोत असणे गरजेचे आहे. पती -पत्नी जर दोघेही कमावते असतील तर एकाच्या पगारात घरखर्च चालवावा. तर दुसऱ्याचा पगाराची बचत करावी. म्हणजे अल्पावधीतच तुमच्याकडे बऱ्यापैकी बँक बँलन्स राहील.

विमा पॉलीसी

तसेच जितक्या लवकर होणार असेल तितक्या लवकर विमा पॉलीसी घ्यावी. यामुळे संकटकाळात कुटुंबाला हातभार लागेल. त्यासाठी ओळखीच्या एजंटकडून टर्म लाईफ प्लान खरेदी करावा. अगदी मामुली रक्कम देऊनही तुम्ही कोट्यवधीचा विमा उतरवू शकता.

money
मनसेची गांधीगिरी! 53 रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल विक्री

इमर्जन्सी फंड

इमर्जन्सी फंड म्हणजे गरजेवेळी आपलेच पैसे आपल्या उपयोगी पडणे. यासाठी चांगल्या विमा एजंटकडून पॉलीसी काढून घ्याव्यात. गरजेवेळी हाती पैसा मिळेल अशा प्रकारच्या पॉलीसी काढाव्यात. यात मुलांचे शिक्षण, लग्न, हेल्थ यांपासून सगळ्या पॉलीसी असतात. त्यांचा योग्य वापर करावा.

money
नाशिकमध्ये भाजपचे अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर - संजय राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.